Join us  

Maharashtra Election 2019: मुंबई जिल्ह्यात 36 विधानसभा मतदारसंघात एकूण 333 उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 8:55 PM

Maharashtra Election 2019: मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने येत्या २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीकरिता नामनिर्देश पत्रे सादर करण्यास दि. २७ सप्टेंबर २०१९ रोजी सुरुवात झाली होती.

मुंबई: मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने येत्या २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीकरिता नामनिर्देश पत्रे सादर करण्यास दि. २७ सप्टेंबर २०१९ रोजी सुरुवात झाली होती. तर ४ ऑक्टोबर २०१९ ही नामनिर्देश पत्रे सादर करण्याची अंतिम मुदत होती. या कालावधीत एकूण ३३४ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. या नामनिर्देश पत्रांची छाननी दि. ५ ऑक्टोबर २०१९ रोजी करण्यात आली. या छाननीदरम्यान ५९ उमेदवारांची  नामनिर्देशपत्रे अवैध, तर २७६ उमेदवारांची नामनिर्देश पत्रे वैध ठरली.

नामनिर्देश पत्रे वैध ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे अर्ज ७ ऑक्टोबर २०१९ पर्यंत मागे घेण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिम दिवसापर्यंत २६ विधानसभा मतदार संघांतून ३२ उमेदवारांनी माघार घेतली आहे. ज्यामुळे आता मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधान सभा मतदार संघात एकूण २४४ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. या २६ विधानसभा मतदारसंघांपैकी १६८ – चांदिवली व १७२ - अणुशक्तीनगर या दोन्ही मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच प्रत्येकी १५ उमेदवार आहेत. तर १५२ – बोरिवली व १७७ – वांद्रे पश्चिम या दोन मतदारसंघात सर्वात कमी म्हणजेच प्रत्येकी ४ उमेदवार आहेत.

तसेच मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत 10 विधानसभा मतदार संघासाठी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी 3 मतदारसंघातून 5 उमेदवारांनी माघार घेतली आहे. नामनिर्देशनपत्र मागे घेतलेले उमेदवार मतदारसंघ क्र.178- धारावी -पुर्वेश गजानन तावरे (महाराष्ट्र क्रांती सेना), 182 वरळी - अमोल आनंद निकाळजे (अपक्ष), अंकुश वसंत कुऱ्हाडे (अपक्ष), सचिन दयानंद खरात (अपक्ष), 186- मुंबादेवी – अब्बास एफ छत्रीवाला (अपक्ष) यांनी नामनिर्देशनपत्र मागे घेतले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई शहर शिवाजी जोंधळे यांनी दिली. मुंबई शहर जिल्हयातील 10 मतदारसंघात एकुण 94 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध ठरले होते त्यापैकी आज 5 उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतल्यामुळे एकुण उमेदवारांची संख्या 89 आहे. असेही श्री. जोंधळे यांनी सांगितले

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019निवडणूकभारतीय निवडणूक आयोग