Join us

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शरद पवार यांच्या पक्षाचाच व्हावा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मुंबईत एल्गार

By मनोहर कुंभेजकर | Updated: September 2, 2024 20:02 IST

सुमारे ५ ते ६ हजार तरुण-तरुणी यावेळी उपस्थित होते.

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई- राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार  गटाच्या मुंबईच्या वतीने काल रात्री घाटकोपर पश्चिम, छत्रपती शिवाजी महाराज चौक  येथे युवा संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते.  पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरद पवार साहेब यांनी मेळाव्याला उपस्थित तरुणांशी संवाद साधला.  सदर मेळाव्याला तरुणांचा उदंड प्रतिसाद लाभला असून सुमारे ५ ते ६ हजार तरुण-तरुणी यावेळी उपस्थित होते.

आगामी सरकारमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री,  शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच व्हावा असा एल्गार पक्षाचे युवकचे मुंबई अध्यक्ष आणि मेळाव्याचे आयोजक ॲड.अमोल मातेले यांनी केला. त्याला उपस्थित तरुणांनी जोरदार समर्थन दिले.  

राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड,  ईशान्य मुंबईचे उद्धव सेनेचे खासदार संजय दिना पाटील, पक्षाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव आदी मान्यवर सदर मेळाव्याला उपस्थित होते.

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस