महाराष्ट्र उत्सव दणक्यात
By Admin | Updated: December 11, 2014 01:07 IST2014-12-11T01:07:57+5:302014-12-11T01:07:57+5:30
मराठमोळा महोत्सव म्हणून ओळखला जाणारा राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन ‘महाराष्ट्र उत्सव’ पार पडला.

महाराष्ट्र उत्सव दणक्यात
मुंबई : मराठमोळा महोत्सव म्हणून ओळखला जाणारा राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन ‘महाराष्ट्र उत्सव’ पार पडला. पर्णिका संस्था आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन, यांच्या संयुक्त विद्यमाने गेली 17 वर्षे साज:या झालेल्या या महोत्सवात सळसळत्या तरुणाईला कलाकारांची साथ मिळाली.
हटके इव्हेंट्स आणि सेलीब्रिटींच्या उपस्थितीत ‘महाराष्ट्र उत्सव’ दणक्यात साजरा झाला. महोत्सवात 11क् महाविद्यालयांतील विद्याथ्र्यानी हजेरी लावली होती. काही नेहमीच्या पारंपरिक स्पर्धाबरोबर लोकनृत्य, महाराष्ट्र दर्शन लावणी अशा मराठी संस्कृतीशी संबंधित स्पर्धाही रंगल्या.
पथनाटय़ स्पर्धेत कीर्ती महाविद्यालय, फॅशन शोमध्ये एच. आर. महाविद्यालय अव्वल ठरले. रुईया महाविद्यालयाच्या विद्याथ्र्यानी सादर केलेल्या ‘मानवाची उत्क्रांती’ या मूकनाटय़ाला प्रथम पारितोषिक मिळाले. मराठी रॉकबॅण्डसारख्या स्पर्धेचा समावेश करून परीक्षक अमित धुरी यांनी स्पर्धकांचे कौतुक
केले. (प्रतिनिधी)
महोत्सवात मुंबईतूनच नव्हे, तर नवी मुंबई, पनवेल, पुणो, नाशिक येथील 11क् महाविद्यालयांतील विद्याथ्र्यानी हजेरी लावली होती.
गेल्या अनेक वर्षापासून सुरू असणा:या या महोत्सवात महाविद्यालयांची फिरता चषक मिळवण्यासाठी खरी चढाओढ सुरू असते. या घोडदौडीत सवरेत्कृष्ट महाविद्यालयाचा मान डी. जी. रुपारेल महाविद्यालयाने मिळवला. सवरेत्कृष्ट संघ म्हणून महर्षी दयानंद महाविद्यालयाला सन्मानित करण्यात आले.