Maharashtra Assembly Election Result 2024: अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाप्रमाणेच मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातही २० नोव्हेंबर रोजी मतदान झालं. महायुतीनं या मतदारसंघातून शिवसेनेनं मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुरजी पटेल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि त्यांना ४५ हजारांहून अधिक मतं मिळाली. तर दुसरीकजे महाविकास आघाडीनं शिवसेना उबाठाच्या विद्यमान आमदार ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली. मात्र यावेळी शिवसेनेच्या मुरजी पटेल यांनी बाजी मारत विजय मिळवलाय. याची अधिकृत घोषणा मात्र अद्याप झालेली नाही. त्यांनी २५ हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवलाय.
२०२२ मध्ये ऋतुजा लटके यांनी येथून पोटनिवडणूक जिंकली होती, यावेळी त्यांच्यासमोर मुरजी पटेल यांचंच आव्हान होतं. शिवसेना उबाठाच्या उमेदवार ऋतुजा लटके या रमेश लटके यांच्या पत्नी आहेत.
मुरजी पटेल यांनी अपक्ष उमेदवार म्हणून २०१९ ची निवडणूक लढवली होती. त्यांना ४५ हजारांहून अधिक मतं मिळाली. ऋतुजा लटके यांचे पती दिवंगत रमेश लटके यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांच्या निधनानंतर २०२२ मध्ये ऋतुजा लटके यांनी येथून पोटनिवडणूक जिंकली होती. या ठिकाणी २ लाख ८४ हजारांहून अधिक मतदार आहेत.