Join us  

महाराष्ट्रात पाऊस, पुरांमुळे ५० तर वीज, वादळांमुळे २३ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 2:36 AM

देशभरात २०२० साली मान्सून पुरेपूर बरसला आहे. मात्र अतिवृष्टी, पूर, जमीन खचणे, वादळ, वीज चमकणे आणि पडणे, थंडीच्या लाटा अशा घटना प्रामुख्याने घडल्या आहेत.

मुंबई : मान्सूनपूर्व, मान्सून आणि मान्सूननंतर देश, राज्य आणि शहरांत मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळला. परिणामी पुराच्या घटना घडल्या असून, देशभरात अशा घटनांत तब्बल ६०० नागरिकांचे जीव गेले आहेत. तर महाराष्ट्रात ५० नागरिकांचे जीव गेले आहेत. देशभरात वीज पडून ८१५ नागरिकांचे जीव गेले असून, महाराष्ट्रात २३ नागरिकांचे जीव गेले आहेत. शिवाय थंडीच्या लाटेमुळे देशभरात १५० नागरिकांचे जीव गेले.

देशभरात २०२० साली मान्सून पुरेपूर बरसला आहे. मात्र अतिवृष्टी, पूर, जमीन खचणे, वादळ, वीज चमकणे आणि पडणे, थंडीच्या लाटा अशा घटना प्रामुख्याने घडल्या आहेत. अशा घटनांत मोठी मनुष्यहानी झाली आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशात मोठी हानी झाली असून, येथे ३५० हून अधिक नागरिकांचे जीव गेले आहेत. २०२० साली चक्रीवादळेदेखील मोठी उठली. उत्तर हिंद महासागरात ५ चक्रीवादळे उठली. अरबी समुद्रात गती आणि निसर्ग तर बंगालच्या उपसागरात अम्फान, निवार, बुरेवी ही चक्रीवादळे उठली होती.

वादळ, वीज आणि मनुष्यहानीबिहार     २८०उत्तर प्रदेश     २२०झारखंड     १२२मध्य प्रदेश     ७२महाराष्ट्र     २३आंध्र प्रदेश     २०थंडीच्या लाटा आणि मनुष्यहानीn उत्तर प्रदेश ८८, बिहार ४५झारखंड १६ 

हवामान घडामोडी आणि मनुष्यहानीआसाम १२९, केरळ ७२, तेलंगणा ६१, बिहार ५४, महाराष्ट्र ५०, उत्तर प्रदेश ४८, हिमाचल प्रदेश ३८चक्रीवादळे आणि मनुष्यहानीn अम्फानमुळे ९० नागरिकांचे जीव गेलेn निसर्गमुळे ४ नागरिकांचे जीव गेलेn निवारमुळे १२ नागरिकांचे जीव गेलेn बुरेवीमुळे ९ नागरिकांचे जीव गेले(स्रोत : भारतीय हवामान शास्त्र विभाग)  

टॅग्स :मुंबईमृत्यू