पेणमध्ये ३१ गावांत महिलाराज!
By Admin | Updated: May 29, 2015 23:17 IST2015-05-29T23:17:54+5:302015-05-29T23:17:54+5:30
पेणच्या ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत शुक्रवारी महाकाली सभागृहात विभागीय महसूल अधिकारी किरण पाणबुडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

पेणमध्ये ३१ गावांत महिलाराज!
पेण : पेणच्या ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत शुक्रवारी महाकाली सभागृहात विभागीय महसूल अधिकारी किरण पाणबुडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये ३१ ग्रामपंचायतींवर पुढील पाच वर्षांसाठी म्हणजे २०१६ ते २०२० पर्यंत महिला सरपंच विराजमान होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने ६३ पैकी ३१ ग्रामपंचायतींवर महिलाराज अवतरणार आहे.
सरपंच आरक्षणात अनुसूचित जाती महिला आरक्षणात रोडे ग्रामपंचायत ही एकमेव अशा प्रवर्गासाठी आरक्षित आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गात एकूण १३ ग्रामपंचायती समाविष्ट असून यातील सहा ग्रामपंचायतींसाठी महिला आरक्षण आहे. सावरसई, सापोली, निधवली, वरसई, वरप व मुडाणी तर याच प्रवर्गातील महलमिऱ्या डोंगर, बोरगाव, बेलवडे, जावळी, परेडी, खारपाले, कास या ग्रामपंचायतींमध्ये खुले आरक्षण आहे.
नागरिकांच्या मागास प्रवर्गात १७ ग्रामपंचायती आरक्षणात नऊ ग्रामपंचायती व ओबीसी महिला आरक्षण पडले असून यामध्ये सोमखार, आमटेन, शिहू, पाटणोली, पाबळ, बोरी, करंबेली, वढाव व वाशिवली या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याच प्रवर्गातील उर्वरित आठ ग्रामपंचायतींमध्ये खुले आरक्षण आहे यात काहेश्री, मसद बु., हमरापूर, उंबर्डे, अंतोरे, बळवली, तरणखोप, निगड या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. खुल्या गटात ३२ ग्रामपंचायतींचा समावेश असून यातील १५ ग्रामपंचायतीत सरपंच पद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. यात कुहिरे, करोटी, गागोदे खुर्द, शिर्की, वरवणे, दूरशे, कामार्ली, वाक्रुळ, आंबिवली, रावे, कोपर, दुष्मी, डोलरी, काराव, कोलेटी या १५ ग्रामपंचायती आहेत. उर्वरित १७ ग्रामपंचायतीत खुल्या गटामध्ये आंबेघर, वाशी, बेणसे, शेडाशी, कोप्रोली, झोतिपाठा, जिते, कळवे,दादर, दिव, कणे, बोर्झे, खरोशी, कांदळे, वडखळ, मळेघर यांचा सामावेश आहे.
या आरक्षण संदभांतील बैठकीला महिलांही मोठया संख्येने उपसिथत होत्या या आरक्षण सोडतीच्या वेळी पेण पंचायत समितीच्या सभापती दर्शना म्हात्रे, महादेव दिवेकर, जि.प. सदस्य डी. बी. पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष अशोक मोकल यांच्यासह प्रशांत घरत, तहसीलदार सुकेशिनी पगारे, नायब तहसीलदार एम. आर. हाडके, बी.के.वाडकर, नागोठकर, गटविकास अधिकारी जी. एच. राजपूत, तहसील कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.(वार्ताहर)
एकूण ६३ ग्रामपंचायती
महिला आरक्षण ३१ ग्रामपंचायतींमध्ये अनु. जाती, अनु. जमाती ६, ना. मा. प्रवर्ग ९, खुला गट १५
प्रवर्गानुसार खुले आरक्षण ३२ ग्रामपंचायती- अनु. जाती १, अनु. जमाती १२, ना. मा. प्रवर्ग १७