एसटीची १०-१५ टक्के भाडेवाढ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 02:26 AM2018-04-20T02:26:47+5:302018-04-20T02:26:47+5:30

साधी एसटी ते शिवशाही’ सर्व प्रकारच्या तिकीट दरांमध्ये सुमारे १० ते १५ टक्के दर वाढवण्याची तरतूद केली आहे.

महामंडळाचा प्रस्ताव तयार : कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीनंतर प्रवाशांवर भार | एसटीची १०-१५ टक्के भाडेवाढ?

एसटीची १०-१५ टक्के भाडेवाढ?

Next

महेश चेमटे ।
मुंबई : एसटीचा आर्थिक तोटा कमी करण्यासाठी महामंडळाने कर्मचाºयांनंतर प्रवाशांकडे रोख वळवला आहे. एसटी प्रशासनाने सर्व एसटीच्या तिकीटदरांमध्ये सुमारे १० ते १५ टक्के दरवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. राज्य परिवहन आयोगाच्या मंजुरीनंतर ही भाडेवाढ लागू होणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीचा संचित तोटा कमी करण्यासाठी कर्मचाºयांनंतर प्रवाशांकडे रोख वळवला आहे. डिझेलचे वाढते दर आणि आगामी होणाºया वेतन करारामुळे महामंडळाने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार प्रस्तावदेखील तयार केला असून प्रस्तावात ‘साधी एसटी ते शिवशाही’ सर्व प्रकारच्या तिकीट दरांमध्ये सुमारे १० ते १५ टक्के दर वाढवण्याची तरतूद केली आहे.
परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी कामगारांचा वेतन करार १ मे रोजी होणार असल्याची घोषणा केली. एसटी तोट्यात असल्याचे सांगत दोन वर्षे वेतन करार करण्यात महामंडळाला अपयश आले. आता वेतन करार अंतिम टप्प्यात आला असून केवळ घोषणेची औपचारिकता बाकी आहे. वेतन करारामुळे होणारा आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी प्रवाशांवर भाडेवाढीची कुºहाड कोसळण्याची शक्यता आहे. महामंडळाचा भाडेवाढीचा निर्णय इंधन दर, टायर दर, बस बांधणी आणि कामगारांचा महागाई भत्ता (पान ५ वर)

राज्य परिवहन आयोगाकडे भाडेवाढीचा चेंडू
एसटी महामंडळात ३१ जुलै व २२ आॅगस्ट २०१४ रोजी दोन टप्प्यांत भाडेवाढ केली होती. ही भाडेवाढ एकूण १४ टक्के होती. कामगारांच्या महागाई भत्त्यात २०१४ साली १०७ टक्के तर २०१८ साली १३६ टक्के वाढ केली आहे. यामुळे महामंडळाने सरसकट १० ते १५ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. राज्य परिवहन आयोगाच्या मंजुरीनंतर भाडेवाढ होईल. मात्र नवीन भाडेवाढ सुट्टीच्या काळात होणार की सुट्टीनंतरच्या काळात होणार, यावर महामंडळाने भाष्य करणे टाळले.

Web Title: महामंडळाचा प्रस्ताव तयार : कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीनंतर प्रवाशांवर भार

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.