मुंबई : दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरात महारेराने बिल्डरांच्या ८०९ गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. महारेराने दसऱ्यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्पांना नोंदणी क्रमांक देण्याची ही पहिलीच वेळ असावी. यांत दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होणारे, मुदतवाढ दिलेले आणि काही सुधारणा केलेल्या गृहप्रकल्पांचा समावेश आहे. दसऱ्याच्या आदल्या दिवशी २०० प्रकल्पांना प्रमाणपत्र मंजूर करण्यात आले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवरही कायदेविषयक, तांत्रिक आणि आर्थिक निकषांची पूर्तता करणाऱ्या प्रकल्पांना महारेराने मंजुरी दिली आहे.
दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्याची, घोषित करण्याची परंपरा रिअल इस्टेट क्षेत्रात आहे. हे वर्षही त्यास अपवाद नाही. ८०९ प्रकल्पांत नवीन नोंदणी क्रमांकाचे ४०५ प्रकल्प आहेत. २०९ प्रकल्पांच्या मुदतवाढीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. शिवाय १९५ प्रकल्पांनी काही सुधारणांचे प्रस्ताव सादर केले, तेही मंजूर करण्यात आले.
एप्रिल ते सप्टेंबर ४९४० एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत ४९४० प्रकल्पांचे प्रस्ताव महारेराने मंजूर केले. यात २०३९ नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना नोंदणी क्रमांक दिले. बिल्डरांनी प्रकल्प पूर्ततेचा आराखडा देऊन केलेल्या विनंतीनुसार १७४८ जुन्या प्रकल्पांच्या मुदतवाढीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. ११५३ जुन्या प्रकल्पातील सुधारणांचे प्रस्तावही मंजूर करण्यात आले.
कुठे, किती प्रकल्प ?मुंबई शहर, उपनगर ६३ ठाणे ५८ रायगड ४१ पालघर २२ रत्नागिरी ९सिंधुदुर्ग ४पुणे १२२ सातारा ६कोल्हापूर ४ सांगली ४सोलापूर ३ नागपूर २० अमरावती ५अकोला ४चंद्रपूर २ नाशिक २३ अहिल्यानगर ५ धुळे १संभाजीनगर ५जालना ३लातूर १
१९५ प्रकल्पांनी काही सुधारणांचे प्रस्ताव सादर केले, तेही मंजूर करण्यात आले आहेत.
Web Summary : MahaRERA approved 809 housing projects in a month before Diwali, including new registrations, extensions, and revisions. From April to September, 4940 projects were approved, fostering real estate growth across Maharashtra.
Web Summary : दिवाली से पहले महारेरा ने एक महीने में 809 आवास परियोजनाओं को मंजूरी दी, जिनमें नए पंजीकरण, विस्तार और संशोधन शामिल हैं। अप्रैल से सितंबर तक, 4940 परियोजनाओं को मंजूरी दी गई, जिससे महाराष्ट्र में रियल एस्टेट विकास को बढ़ावा मिला।