मुंबई दर्शनबरोबरच मेट्रो प्रवासाचीही पर्वणी

By Admin | Updated: August 22, 2015 01:21 IST2015-08-22T01:21:13+5:302015-08-22T01:21:13+5:30

मुंबई मेट्रोने प्रवासी आणि उत्पन्नवाढीसाठी नव्या शक्कल लढवण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांना मुंबई दर्शन घडवण्याचा निर्णय मेट्रोने घेतला असून

The magnificent metro travels along with the Mumbai philosophy | मुंबई दर्शनबरोबरच मेट्रो प्रवासाचीही पर्वणी

मुंबई दर्शनबरोबरच मेट्रो प्रवासाचीही पर्वणी

मुंबई : मुंबई मेट्रोने प्रवासी आणि उत्पन्नवाढीसाठी नव्या शक्कल लढवण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांना मुंबई दर्शन घडवण्याचा निर्णय मेट्रोने घेतला असून त्याचबरोबर मेट्रो प्रवासही घडवला जाणार आहे. यासाठी फक्त ३00 रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याचे मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून सांगण्यात आले.
यासाठी एक ‘कॉम्बो पॅकेज’ मेट्रोकडून प्रवाशांसाठी बनवण्यात आले आहे. यात प्रवाशांना कूपन दिले जाणार असून ३0 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ३0 दिवसांच्या आत ते न वापरल्यास कूपन अवैध ठरणार असल्याचे मेट्रोकडून सांगण्यात आले. या पॅकेजनुसार प्रवासी आधी मुंबई दर्शन घेऊन त्यानंतर मेट्रोची सफर करू शकतील किंवा प्रथम मेट्रोची सफर करून त्यानंतरही मुंबई दर्शन घेऊ शकतात. हा निर्णय प्रवाशांकडूनच घेतला जाईल. मुंबई दर्शनमध्ये जवळपास ५0 ठिकाणांचे दर्शन प्रवाशांना घडवण्यात येईल. (प्रतिनिधी)

Web Title: The magnificent metro travels along with the Mumbai philosophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.