माघी गणेश उत्सव उत्साहात साजरा

By Admin | Updated: January 24, 2015 01:18 IST2015-01-24T01:18:29+5:302015-01-24T01:18:29+5:30

पनवेल, नवी मुंबई परिसरामध्ये भक्तिभावाने माघी गणेश उत्सव साजरा करण्यात आला. ३०० सार्वजनिक मंडळांनी व २७५ घरांमध्ये श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

Maghi celebrated Ganesh festival | माघी गणेश उत्सव उत्साहात साजरा

माघी गणेश उत्सव उत्साहात साजरा

नवी मुंबई : पनवेल, नवी मुंबई परिसरामध्ये भक्तिभावाने माघी गणेश उत्सव साजरा करण्यात आला. ३०० सार्वजनिक मंडळांनी व २७५ घरांमध्ये श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यानिमित्ताने शहरात भजन, कीर्तनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
माघी गणेश जयंतीनिमित्त शिरवणेमधील गणपती मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली होती. नेरूळमधील श्री गणेश हाऊसिंग सोसायटीमध्ये अनेक वर्षांपासून गणेश उत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी पाच दिवसांच्या सोहळ्याचे आयोजन केले असून ह.भ. प. गणेश वाघमारे यांच्या निरूपणाचे आयोजन केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गणपती विसर्जनासाठी व्यवस्था आहे. विभागातील तलाव परिसरामध्ये सुरक्षा रक्षक तैनात केले आहे. मूर्ती विसर्जित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने मंडप उभारून लाइफ गार्डची नेमणूक केली असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहेत. त्याचबरोबर तलाव परिसर सार्वजनिक गणेश मंडळे, मंदिरे आदी ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त होता. (प्रतिनिधी)

Web Title: Maghi celebrated Ganesh festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.