Join us
Daily Top 2Weekly Top 5

एम वॉर्ड मिनी बांग्लादेश; नितेश राणेंचा आरोप

By जयंत होवाळ | Updated: February 10, 2024 21:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापालिकेच्या एम वॉर्ड ला मिनी बांगलादेश म्हणावे लागेल. जेवढे बांगलादेशी रोहिंगे बांगलादेश मध्ये नसतील तेवढ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महापालिकेच्या एम वॉर्ड ला मिनी बांगलादेश म्हणावे लागेल. जेवढे बांगलादेशी रोहिंगे बांगलादेश मध्ये नसतील तेवढ्या लोकांना इथे घर दिले आहे. प्रत्येकाला पानी-वीज  कनेक्शनदिले आहे. या सुविधा देणारा यांचा बाप कोण आहे असा सवाल आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला.

सकल हिंदू समाज्याच्या वतीने शनिवारीमानखुर्द,गोवंडी, चेंबर परिसरात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी आयोजित सभेत राणे बोलत होते. बीएआरसी च्या संरक्षण भिंतीजवळ अनधिकृतपणे मजार, मदरसा बांधण्यात आला आहे. लोकांना चार चार आधार कार्ड देण्यात आले आहेत. रोहिगे आणि बांगलादेशींची वस्ती तिथे वाढत चालली असून बीएआरसीमध्ये काडी टाकल्यास मुंबईची राख रांगोळी होऊन जाईल, असे राणे म्हणाले.

 म्हाडा कॉलनीतील म्हाडाच्या जमिनीवर अनधिकृत मस्जिद उभारण्यात आली आहे. मस्जिदला म्हाडाने नोटीस दिली आहे. पुढील आठ पंधरा दिवसात म्हाडा अधिकाऱ्यांनी येथील मस्जिद न तोडल्यास पंधरा दिवसानंतर बुलडोझर घेऊन जाऊन ती मशीद तोडून टाकू, असा इशारा राणे यांनी दिला.

टॅग्स :नीतेश राणे