गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

By मनोहर कुंभेजकर | Updated: December 20, 2024 19:16 IST2024-12-20T19:16:34+5:302024-12-20T19:16:56+5:30

मजरूह सुलतानपुरी यांना मरणोत्तर जीवनगौरव देण्यात येणार असून त्यांच्या वतीने त्यांचे चिरंंजीव  अंदलिब मजरूह सुलतानपुरी हे पुरस्कार स्वीकारतील.

Lyricist Majrooh Sultanpuri awarded Mohammed Rafi Lifetime Achievement Award | गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

मनोहर कुंभेजकर, मुंबई -१९५० व १९६० च्या दशकांमध्ये बॉलिवूडमधील आघाडीच्या व सर्वात लोकप्रिय गीतकारांपैकी एक असलेल्या असलेल्या मजरूह सुलतानपुरी यांना यावर्षीचा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार जाहिर झाला आहे.

 तर हिंदीसह  बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, तामिळ, तेलगू आणि उर्दू अशा विविध प्रादेशिक भाषांमध्ये आवाज देणाऱ्या ख्यातनाम गायक जावेद अली यांना मोहम्मद रफी पुरस्कार २०२४ महाराष्ट्राचे राज्यपाल  सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष व मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज ही घोषणा केली.

वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे दि, २४ डिसेंबर रोजी दरवर्षी प्रमाणे हा पुरस्कार वितरण सोहळा संध्याकाळी ६  वा. सुरू होणार आहे.

मजरूह सुलतानपुरी यांना मरणोत्तर जीवनगौरव देण्यात येणार असून त्यांच्या वतीने त्यांचे चिरंंजीव  अंदलिब मजरूह सुलतानपुरी हे पुरस्कार स्वीकारतील. पुरस्काराचे हे १८ वे वर्ष असून एक लाख रू धनादेश, स्मृतीचिन्ह आणि शाल श्रीफळ असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असून, ५१ हजार रू. रोख आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे. 

रफी यांचा १०० वा.वाढदिवस असल्यामुळे त्यांचे जन्मशताब्दी वर्षा  निमित्ताने या पुरस्काराचे एक वेगळे महत्त्व
असल्याचे शेलार यांनी सांगितले.

यावेळी प्रसाद महाडकर यांच्या जीवनगाणीतर्फे "फिर रफी" या बहारदार मैफिलीत ख्यातनाम गायक श्रीकांत नारायण हे मोहम्मह रफी यांची अजरामर गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन रेडियो जॉकी असलेले आर. जे  गौरव करणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून कार्यक्रमाच्या प्रवेशिका आशिष शेलार यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.  

Web Title: Lyricist Majrooh Sultanpuri awarded Mohammed Rafi Lifetime Achievement Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई