Join us  

वातावरणातील बदलांमुळे लंग फायब्रॉसिस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 3:48 AM

वातावरणाशी संबंधित लंग फायब्रॉसिस आहे, ज्याला क्रोनिक हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमॉन्टिस असेही म्हणतात. हा फुप्फुसांना होणारा आंतरकोशीय आजार आहे.

मुंबई : परळ येथील खासगी रुग्णालयात ३८ वर्षीय हेमाली शहा आणि ६८ वर्षीय रिटा चोक्सी यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. हेमाली शहा यांना कबुतरांशी आलेल्या नियमित संपर्कामुळे हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमॉन्टिस हा दीर्घकालीन स्वरूपाचा फुप्फुसांचा आजार झाला होता, तर रिटा चोक्सी यांच्या दोन्ही फुप्फुसांचे प्रत्यारोपण करण्यात आले.हेमाली शहा त्यांच्या बोरीवली येथील नवीन घरात राहण्यास गेल्या. काही आठवडे तिथे राहिल्यानंतर त्यांना धाप लागू लागली आणि कोरडा खोकला येऊ लागला. काही महिन्यांनी हा आजार गंभीर होत गेला. आजाराचे निदान झाल्यावर शहा यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. दिवसेंदिवस आजार बळावतच गेला. २०१७ पर्यंत त्यांच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आणि त्यांना घरी आॅक्सिजन थेरपीवर अवलंबून राहावे लागले. आता फक्त फुप्फुसांचे प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय उरला होता. रुग्णाच्या कुटुंबीयांनी त्यांना निराश झालेले पाहिले नव्हते. त्या योग्य उपाय शोधत होत्या. याच काळात त्यांना प्रत्यारोपण कार्यक्रमाची शिफारस करण्यात आली आणि त्यांचे नाव परळ येथील रुग्णालयात नोंदविण्यात आले. रक्तात कार्बन डायआॅक्साइडचे प्रमाण वाढल्यामुळे शस्त्रक्रियेच्या आधी त्यांना रोगाच्या तीव्रतेमुळे दाखल करून घेण्यात आले. झेडटीटीसीने त्यांच्यासाठी फुप्फुस उपलब्ध करून देण्याआधी चार दिवस त्यांना आॅक्सिनजनेशन प्रक्रियेवर ठेवण्यात आले. नागपूरहून फुप्फुसे परळच्या रुग्णालयात आणण्यात आली. प्रत्यारोपणानंतर रुग्ण पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि आता आॅक्सिजन सपोर्टशिवाय व धाप न लागता, त्या दैनंदिन कामे करू शकत आहेत.दक्षिण मुंबईत राहणाºया रिटा चोक्सी या ६८ वर्षीय महिलेलासुद्धा कबुतरांच्या संपर्कामुळे प्रोग्रेसिव्ह लंग फायब्रॉसिस झाला होता आणि त्याही आॅक्सिजन सपोर्टवर अवलंबून होत्या. त्यांच्यावरही दुहेरी फुप्फुस प्रत्यारोपण करावे लागणार लागणार होते. श्वसनयंत्रणा निकामी झाल्याने त्यांना हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावरही दुहेरी फुप्फुस प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यासुद्धा आता धाप न लागता किंवा खोकला न येता एक सामान्य आयुष्य जगत आहेत.आंतरकोशीय आजार : हा वातावरणाशी संबंधित लंग फायब्रॉसिस आहे, ज्याला क्रोनिक हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमॉन्टिस असेही म्हणतात. हा फुप्फुसांना होणारा आंतरकोशीय आजार आहे. तो डिजनरेटिव्ह (सरत्या काळानुसार गंभीर स्वरूप धारणा करणारा) आजार असल्यामुळे शेवटच्या टप्प्यात रुग्णाला फक्त या आजाराचा त्रास सहन करावा लागतो आणि त्यानंतर श्वसनयंत्रणा निकामी होते. कबुतरांची विष्ठा, ओल असलेल्या भिंतींचे किंवा वातानाकूलित डक्ट्समधील ओलाव्यावर तयार होणारी बुरशी, दूषित हवा या घटकांमुळेही हा आजार होऊ शकतो. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या भारतीय आयएलडी रजिस्ट्रीनुसार (२०१७) हा सर्वाधिक प्रमाणात होणारा इंटरस्टिशिअल लंग डिसीज (आयएलडी) म्हणजेच फुप्फुसांच्या आंतरकोशिकांचा आजार असून, त्याचे प्रमाण ४७.३% इतके आहे.गंभीर शस्त्रक्रियेचे आव्हानफुप्फुसाचा संपर्क वातावरण व प्राप्तकर्त्याच्या शरीराशी येत असल्यामुळे, फुप्फुस प्रत्यारोपण हे सर्व प्रत्यारोपणांमध्ये सर्वोच्च आहे. ज्या रुग्णांमध्ये फुप्फुसांच्या प्रत्यारोपणाची आवश्यकता असते, ते बहुधा स्टेरॉइड्सवर असतात, अशक्त झालेले असतात, अंथरुणाला खिळलेले असतात. कारण त्यांना आॅक्सिजनचा पुरवठा पुरेसा नसतो आणि त्यांचे पोषणही होत नसते. त्यांच्यावर उपचार करणाºया टीमसाठी ही असामान्य आव्हाने असतात. त्यांना एका महत्त्वाच्या शस्त्रक्रियेसाठी तयार करणे आणि शस्त्रक्रियेच्या अत्यंत गंभीर टप्प्यातून नेणे व शस्त्रक्रियेनंतर प्रकृती सामान्य करण्यासाठी अत्यंत प्रशिक्षित व तज्ज्ञ वैद्यकीय टीमची आवश्यकता असते.- डॉ. संदीप अट्टावार, रुग्णालय संचालक

टॅग्स :मुंबईआरोग्य