कंदिलांनी सजल्या बाजारपेठा
By Admin | Updated: October 16, 2014 22:55 IST2014-10-16T22:55:51+5:302014-10-16T22:55:51+5:30
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. आकाश कंदिलाविना दिवाळी हा विचारसुद्धा अशक्यच आहे. दिवाळीत आकाश कंदिलास अनन्यसाधारण महत्त्व आहे.

कंदिलांनी सजल्या बाजारपेठा
महेश बाफना - मुंबई
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. आकाश कंदिलाविना दिवाळी हा विचारसुद्धा अशक्यच आहे. दिवाळीत आकाश कंदिलास अनन्यसाधारण महत्त्व आहे. दरवर्षी दिवाळीत प्रत्येक घराबाहेर आकाश कंदील लावला जातो. आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. या दिवाळीत नवनवीन वैशिष्टय़पूर्ण आकारातील आणि मनमोहक रंगसंगतीतील आकाशकंदील सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
आकाश कंदिलांच्या बाजाराबद्दल दादर (प.) मधील छबिलदास रोडवरील व्यावसायिक पवार सांगतात की, नावीन्यपूर्ण कलाकृती असलेल्या कुंदन आणि डायमंड वर्क असलेल्या आकाश कंदिलाला ग्राहकांची पसंती लाभत आहे. कारण यात सायंकाळच्या वेळेस बल्ब लावला असता, त्या आकाश कंदिलातून बाहेर पडणारा रंग व त्या आकाश कंदिलावर लावलेल्या डायमंडवर पडणा:या इतर लाइट्समुळे हे आकाश कंदील अधिक खुलून दिसतात. या रत्नजडित आकाश कंदिलाची किंमत 5क्क् ते 22क्क् रुपयांच्या दरम्यान आहे. मागील काही दिवसांपासून ग्राहक आकाश कंदील घेण्यासाठी येत असल्याचेही त्यांनी सांगितले. छोटय़ा आकारातील लहान आकाश कंदील अगदी 1क् रुपये प्रतिनग एवढे स्वस्तदेखील मिळत आहेत.
आकाश कंदिलाची किंमत कितीही असली तरी मी ती द्यायला तयार आहे, फक्त आकाश कंदील आकर्षक असावे.
आकाश कंदील खरेदी करताना मी संपूर्ण बाजारपेठ पालथी घालतो, असे रत्नजडित आकाशकंदील खरेदी करणारे ग्राहक रवी कुरील यांनी सांगितले. एकूणच ग्राहक आता आकर्षक आकाश कंदील
खरेदी करण्यात व विक्रेते ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यात गुंतल्याचे दिसून आले.
च्यंदा बाळासाहेबांचे छायाचित्र असलेल्या आकाश कंदिलाला बाजारपेठेत विशेष मागणी आहे. या आकाश कंदिलाची किंमत 15क् ते 45क् रुपये आहे. या वर्षीचे दुसरे आकर्षण म्हणजे मातीचा आकाश कंदील! पारंपरिक पणत्यांसारखे वेगळेपण जपणारा हा आकाश कंदिलही ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहे.
च्या कंदिलाची किंमत 3क्क् ते 6क्क् रुपयांदरम्यान आहे. तसेच बाजारपेठेत चांदणी, पॅराशूट, झुंबर, मोत्यांपासून, पारदर्शी कापडापासून तयार केलेले लहान-मोठे आकाश कंदीलही बाजारपेठेत दिसून येत आहेत. त्यांची किंमत 1क्क् पासून 2क्क्क् रुपयांर्पयत आहे.