आठ आठवडय़ांची नीचांकी पातळी

By Admin | Updated: December 9, 2014 03:10 IST2014-12-09T03:10:28+5:302014-12-09T03:10:28+5:30

नफेखोरी व विक्रीचा दबाव यामुळे मुंबई व दिल्ली शेअरबाजाराच्या निर्देशांक व निफ्टीची जबरदस्त घसरण झाली असून, दोन्ही निर्देशांकानी आठ आठवडय़ातील नीचांक गाठला आहे.

Low level of eight weeks | आठ आठवडय़ांची नीचांकी पातळी

आठ आठवडय़ांची नीचांकी पातळी

मुंबई : नफेखोरी व विक्रीचा दबाव यामुळे मुंबई व दिल्ली शेअरबाजाराच्या निर्देशांक व निफ्टीची जबरदस्त घसरण झाली असून, दोन्ही निर्देशांकानी आठ आठवडय़ातील नीचांक गाठला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 339 अंकानी खाली आला असून दिल्लीच्या निफ्टी बाजाराचा निर्देशांक 1क्क् अंकानी कोसळला आहे. इन्फोसिसच्या काही संस्थापकानी कंपनीचे 6,484 कोटी रुपयाचे शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला, याचा जबरदस्त परिणाम होऊन बाजार धराशयी झाले. इन्फोसिसचा शेअर 4.88 टक्के घसरला. 
तीस शेअर्सचा मुंबई निर्देशांक दिवसभराच्या व्यवहारात 28,क्97.12 र्पयत खाली आला. पण मजबूत शेअर्समुळे बाजार काहीसा सावरला वनिर्देशांक 338.7क् अंकाची घसरण होऊन 28,119 . 4क् अंकावर बंद झाला. 
याप्रमाणो नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी 1क्क्.क्5 अंकाने कोसळला  असून, 85क्क् च्या खाली उतरत 8,438.25 अंकावर बंद झाला. 16 ऑक्टोबर रोजी निफ्टी 115.8क् अंकाने कोसळला होता. त्यानंतर निफ्टी नीचांकावर घसरला आहे. 
ब्रोकरेज फर्म रेलिगेअर सिक्युरीटीजचे अध्यक्ष जयंत मांगलिक यासंदर्भात बोलताना म्हणाले की , इन्फोसिस संचालकांच्या निर्णयामुळे आयटीचे शेअर्स घसरले. उपभोक्ता सामान व बँकींग शेअर्समध्ये नफेखोरी झाली व विक्रीचा दबाव वाढला. शोअर बाजारातील अस्थायी आकडेवारीनुसार परदेशी पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करणा:या गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 1क्9.45 कोटी रु च्या शेअर्सची विक्री केली. 
सेसा स्टरलाईट - 3.6क् टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 3.32 टक्के , हिंडाल्को - 2.51 टक्के, टीसीएस - 2.51 टक्के, डॉरेड्डीज लॅब  -2.35 टक्के, टाटा स्टील - 2.क्1 टक्के , भेल- 1.88 टक्के , एल अँड टी - 1.72 टक्के याप्रमाणो घसरण झाली. 
तर टाटा मोटर्स - 1.71, विप्रो- 1.62 टक्के, एचडीएफसी बँक 1.61 ,स्टेट बँक - 1.39, आयसीआयसीआय बँक - 1.34 टक्के , व रिलायन्स इंडस्ट्रीज -1.34 टक्के घसरणीसह बंद झाले. 
कोल इंडिया -2.2क् टक्के, आयटीसी- 1.63 टक्के, सन फार्मा - क्.91 ओएनजीसी - क्.63 , सिप्ला - क्.61 याप्रमाणो मजबुत झाले. (वृत्तसंस्था)
 
4जपान व चीनकडून आलेल्या निराशाजनक आकडेवारीचा परिणाम अशियायी बाजारावर झाला व तैवान, सिंगापूर, दक्षिण कोरिया  यांच्या निर्देशांकात क्.21 टक्क्यापासून क्.8क् टक्क्यार्पयत घसरण झाली.
4 जपान , चीन व हाँगकाँग बाजार सकारात्मक वाढ होत बढतीवर बंद झाले.

 

Web Title: Low level of eight weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.