कमी बजेटच्या चित्रपटांना सुगीचे दिवस यावेत

By Admin | Updated: May 31, 2014 23:39 IST2014-05-31T23:39:36+5:302014-05-31T23:39:36+5:30

राजस्थानमधल्या गावातून मुंबईत येऊन संघर्ष करणा:या एका तरुणाच्या जीवनावर हा चित्रपट आहे. या चित्रपटाला खरेतर चांगले यश मिळेल, अशी अपेक्षा आहे

Low-budget movies should be used for souvenirs | कमी बजेटच्या चित्रपटांना सुगीचे दिवस यावेत

कमी बजेटच्या चित्रपटांना सुगीचे दिवस यावेत

>शुक्रवारी हंसल मेहता यांचा सिटीलाइट्स हा चित्रपट प्रदर्शित झाला. राजस्थानमधल्या गावातून मुंबईत येऊन संघर्ष करणा:या एका तरुणाच्या जीवनावर हा चित्रपट आहे. या चित्रपटाला खरेतर चांगले यश मिळेल, अशी अपेक्षा आहे. पण पहिल्याच दिवशी त्याची कमाई फारशी चांगली न झाल्याने थोडे काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरुवातीपासूनच चित्रपटाच्या संपूर्ण टीमने जोरदार प्रसिद्धी केली होती. तरी पहिल्या दिवशी ज्यांनी चित्रपट पाहिला त्यांच्या सकारात्मक प्रतिक्रियेवर चित्रपटाचे भवितव्य अवलंबून आहे. हे भवितव्य येत्या दोन दिवसांत कळेलच.
चित्रपटाची भरपूर प्रसिद्धी करूनही त्याला अपेक्षित यश न मिळाल्याचे उदाहरण हवाहवाई हा चित्रपट आहे. अमोल गुप्तेंचा हा चित्रपट एका गरीब मुलाच्या स्केटिंगवरच्या स्वप्नांवर आधारित होता. या चित्रपटाच्या टीमने प्रसिद्धी करण्यात कोणतीच कसूर सोडलेली नव्हती. बॉलीवूडच्या कलाकारांनीही चित्रपटाची स्तुती केली होती. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मात्र त्याने आपला झालेला खर्च भागवण्यार्पयतच मजल मारली. या चित्रपटाला सरासरीच प्रतिसाद मिळाला. अशाप्रकारे कथा चांगली असूनही अनेक चित्रपटांना प्रतिसाद मिळत नसल्याची उदाहरणो सध्या वाढत आहेत. 
सिटीलाइट आणि हवाहवाई या चित्रपटांबद्दल एक समान धागा जोडलेला आहे. अशा छोटय़ा बजेटच्या चित्रपटांची योग्य प्रसिद्धी करूनही त्यांना बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळत नाही. त्यामुळे हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. याची कारणो काय असू शकतात, असा विचार केल्यास असे दिसते की चित्रपट वितरण बाजारामधील असमानता. महत्त्वाचे म्हणजे मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांतील तिकीटदर हे 2क्क् ते 5क्क् रुपयांदरम्यान असतात. छोटय़ा बजेटच्या चित्रपटांबाबतीत या दरांचा ताळमेळ बसत नाही. तसेच चित्रपटात मोठे कलाकारही नसल्यामुळे सामान्य प्रेक्षकांना चित्रपटांचे फारसे आकर्षण नसते. त्यामुळे हे चित्रपट मल्टिप्लेक्सममधून लवकर बाहेर पडतात. जर या चित्रपटांसाठी मल्टिप्लेक्सने दर कमी केले तर या चित्रपटांच्या कमाईत वाढ होईल आणि हे चित्रपट चांगले असल्यास त्यांच्या यशाचा मार्गही मोकळा होईल. बिग बजेटच्या चित्रपटांच्या माध्यामातून कमाई करणा:या या बदलासाठी पुढाकार घेणो गरजेचे आहे; तरच छोटय़ा बजेटच्या चित्रपटांनाही सुगीचे दिवस येतील. 

Web Title: Low-budget movies should be used for souvenirs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.