हरविलेले आठ तोळ्यांचे दागिने सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:07 IST2021-01-15T04:07:20+5:302021-01-15T04:07:20+5:30

मुंबई : कुलाबा परिसरात राहणारे गौतम हे बुधवारी रात्री झुलेलाल मंदिरात दर्शन घेऊन घरी परतले. त्यांचे ७ तोळ्यांचे दागिने ...

The lost eight weights of jewelry were found | हरविलेले आठ तोळ्यांचे दागिने सापडले

हरविलेले आठ तोळ्यांचे दागिने सापडले

मुंबई : कुलाबा परिसरात राहणारे गौतम हे बुधवारी रात्री झुलेलाल मंदिरात दर्शन घेऊन घरी परतले. त्यांचे ७ तोळ्यांचे दागिने मंदिरातच गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मंदिराकडे धाव घेतली; पण मंदिर बंद झाले हाेते. गस्तीवरील कफपरेड पोलीस शिपाई आव्हाड यांनी मंदिरात शाेध घेऊन दागिने गौतम यांच्या ताब्यात दिले.

.....................................

ऑनलाइन मद्य खरेदी पडली महागात

मुंबई : ऑनलाइन मद्य खरेदी करणे एका वेबडिझायनरला महागात पडले. त्यांना साडेचार हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, गावदेवी पोलिसांनी गुन्हा नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे.

...............................................

बिअरसाठी मोजावे लागले सव्वा लाख

मुंबई : बिअरसाठी व्यावसायिकाला सव्वा लाख रुपये मोजावे लागल्याचा प्रकार मलबार हिल येथे समोर आला आहे. शुक्रवारी ही घटना घडली. याप्रकरणी व्यावसायिकाने तक्रार दाखल केली असून, मलबार हिल पोलीस अधिक तपास करीत आहेत.

.................................

दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

मुंबई : भरधाव दुचाकीच्या धडकेत राकेश गांधी (३१) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मस्जिद बंदर परिसरात बुधवारी घडली. याप्रकरणी गांधी यांचा भाऊ अमित यांनी दिलेल्या तक्रारीवरून पायधुनी पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक चाैकशी करीत आहेत.

...............................

Web Title: The lost eight weights of jewelry were found