उमेदवारांवर करडी नजर!

By Admin | Updated: October 3, 2014 00:50 IST2014-10-03T00:50:48+5:302014-10-03T00:50:48+5:30

मुंबईच्या उपनगर जिल्ह्यातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सर्व राजकीय पक्षांचे तब्बल 38क् उमेदवार उतरले

Look at the candidates! | उमेदवारांवर करडी नजर!

उमेदवारांवर करडी नजर!

>मुंबई : मुंबईच्या उपनगर जिल्ह्यातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सर्व राजकीय पक्षांचे तब्बल 38क् उमेदवार उतरले असून, या सर्वावर निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार आहे. आयोगाने आतार्पयत वेगाने कारवाई केलेली आहे. यापुढेही ती आणखी वेगाने होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रंनी दिली आहे. 
आतार्पयत एकूण 5क् लाख 26 हजार 6क्क् रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर 4 हजार 81क् रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले आहे. वांद्रे पश्चिम येथून 35 लाख 25 हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून, मालाड येथून 12 लाख 5क् हजारांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, भिंती विद्रूपीकरणाची 1 हजार 2क्, पोस्टर 661, बॅनर 1 हजार 521 आणि अन्य 1 हजार 157 अशी 4 हजार 359 प्रकरणांची नोंद घेण्यात आली आहे; ती सर्व विद्रूपीकरण काढून टाकण्यात आले आहे. एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासगी विद्रूपीकरणाची 3क्1 प्रकरणो असून, आता ती सर्व काढून टाकण्यात आली आहेत. ध्वनिक्षेपण यंत्रचे एक प्रकरण असून, त्या संदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर सभा/भाषणो अशी 2 प्रकरणो असून, त्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तक्रार कक्षात आतार्पयत 191 लोकांनी दूरध्वनी केले असून, बहुतेक प्रकरणो मतदार यादीबद्दलच्या चौकशीची आहेत. 3 तक्रारी बॅनर लावण्याबाबतच्या असून, 1 तक्रार आचारसंहितेच्या कालावधीत लादी लावण्याची आहे. (प्रतिनिधी)
 
1विधानसभा निवडणुकीमुळे प्रचार रॅलींमध्ये सहभागी होणा:या आयात कार्यकत्र्याचा भाव वधारला आहे. या कार्यकत्र्याना दिवसभराच्या प्रचारासाठी 5क्क् ते 7क्क् रुपयांसह दोन वेळचे जेवणही देण्यात येत असल्याने या कार्यकत्र्याची दिवाळीआधीच दिवाळी सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचारास सर्वच उमेदवारांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रत्येक घरार्पयत पोहोचण्यास या आयात कार्यकत्र्याचा उमेदवारांना मोठा आधार मिळत आहे.
 
2उमेदवारांच्या प्रचार रॅलींची शोभा वाढविण्यासोबत आपली ताकद दाखविण्यासाठी उमेदवार मतदारसंघाबाहेरून कार्यकर्ते आयात करीत आहेत. स्थानिक कार्यकर्ते सकाळ - सायंकाळच्या रॅलीत सहभागी होऊ शकत नसल्याने उमेदवारांना मतदारसंघातील किंवा बाहेरील कार्यकत्र्याना मानधन देऊन प्रचारासाठी बोलवावे लागत आहे. याची जबाबदारी उमेदवारांनी विश्वासू व्यक्तींवर सोपवली आहे.
 
3 निवडणुकीच्या काळात प्रचार रॅलींमध्ये सहभागी होण्यासाठी काही व्यक्ती कार्यकर्ते पुरविण्याचे काम करीत आहेत. अनेक उमेदवारांना दिवसाला 50 ते 100  कार्यकर्ते पुरविण्यात येत आहेत. यामध्ये मुलीही मोठय़ा संख्येने सहभागी होत आहेत. एका व्यक्तीमागे 600 रुपये उमेदवाराकडून घेतल्यानंतर संबंधित व्यक्ती प्रचारात सहभागी होणा:या व्यक्तीला 300 ते 400 रुपये देत आहेत. यामुळे प्रचाराला माणसे पुरविणा:या व्यक्तींचेही सुगीचे दिवस आहेत.
 
च्मुंबई उपनगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर होती. उमेदवारी अर्जाची छाननी 29 सप्टेंबर रोजी झाली. 5क्4 उमेदवारांनी 642 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 76 उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. 428 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. 1 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. त्यानुसार 26 मतदारसंघांतून 48 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात 38क् उमेदवार आहेत.
च्मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण 7 हजार 346 मतदान केंद्र असून, 15 पेक्षा जास्त उमेदवार असणा:या मतदारसंघात अतिरिक्त बॅलेट युनिट वापरण्यात येणार आहे. भांडुप, घाटकोपर पश्चिम, मानखुर्द-शिवाजी नगर, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व, दिंडोशी आणि गोरेगाव या ठिकाणी डबल बॅलेट युनिट वापरण्यात येणार आहेत.
 
4,588 राज्य शासन
3,039 केंद्र शासन
7,945 प्राथमिक शाळा
11,672 माध्यमिक शाळा
1,475 कनिष्ठ महाविद्यालय
2,829 महाविद्यालय
1क्,696 शैक्षणिक संस्था
 

Web Title: Look at the candidates!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.