‘स्वप्नपूर्ती’च्या घरांची सोडत लांबणीवर?

By Admin | Updated: November 11, 2014 01:11 IST2014-11-11T01:11:17+5:302014-11-11T01:11:17+5:30

सिडकोच्या खारघर येथील ‘स्वप्नपूर्ती’ गृहप्रकल्पातील घरांची सोडत प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Long time to leave the dream house of 'dreamer'? | ‘स्वप्नपूर्ती’च्या घरांची सोडत लांबणीवर?

‘स्वप्नपूर्ती’च्या घरांची सोडत लांबणीवर?

नवी मुंबई : सिडकोच्या खारघर येथील ‘स्वप्नपूर्ती’ गृहप्रकल्पातील घरांची सोडत प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नोव्हेंबरच्या दुस:या आठवडय़ात सोडत काढण्याचे सिडकोकडून याआधी जाहीर करण्यात आले होते. मात्र यासाठी अद्याप कोणतीही तयारी झाली नसल्याने ही सोडत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 
अत्यल्प आणि मध्यमवर्गीयांसाठी सिडकोच्या वतीने खारघर सेक्टर 36  येथे स्वप्नपूर्ती नावाचा भव्य गृहप्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पात 280 आणि 350 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या एकूण 3590 घरांचा समावेश आहे. सध्या शहरात छोटय़ा आकाराची व बजेटमधील घरे उपलब्ध नाहीत. त्यामुळे मागील वर्षभरापासून स्वस्त घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या मध्यमवर्गीय ग्राहकांच्या सिडकोच्या या गृहप्रकल्पावर अक्षरश: उडय़ा पडल्या.  या प्रकल्पातील घरांसाठी जवळपास दोन लाख अर्ज विकले गेले आहेत. तर त्यापैकी 85,107 अर्ज सिडकोला प्राप्त झाले आहेत. या सर्व अर्जाची सोडत  काढण्याच्या दृष्टीने सिडकोने तयारी सुरू केली आहे. सोडतीची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी नोव्हेंबरच्या दुस:या आठवडय़ात सोडतीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र तशा आशयाची कोणतीही तयारी पूर्ण झाली नसल्याने ही सोडत प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे. सोडत काढण्याच्या दृष्टीने  सिडकोची तयारी सुरू आहे. ती पूर्ण होताच साधारण पुढच्या आठ - दहा दिवसांत सोडत काढली जाईल, असे निनावे यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Long time to leave the dream house of 'dreamer'?