दहिसरमध्ये लोकमत आपल्या दारी

By Admin | Updated: July 3, 2016 03:40 IST2016-07-03T03:40:04+5:302016-07-03T03:40:04+5:30

अपुरे पाणी, कचऱ्याचे साम्राज्य अशा समस्या सर्वच विभागांत असतात़ मात्र दहिसरमध्ये वनविभाग असल्याने विकासालाच खीळ बसली आहे़ तर झोपू योजना लागू न झाल्याने

Loksatta your door in Dahisar | दहिसरमध्ये लोकमत आपल्या दारी

दहिसरमध्ये लोकमत आपल्या दारी

मुंबई : अपुरे पाणी, कचऱ्याचे साम्राज्य अशा समस्या सर्वच विभागांत असतात़ मात्र दहिसरमध्ये वनविभाग असल्याने विकासालाच खीळ बसली आहे़ तर झोपू योजना लागू न झाल्याने शांती नगर परिसरात झोपडपट्टी वाढली आहे़ या सर्व समस्या जाणून घेण्यासाठी दहिसर विभागात लोकमत ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमाद्वारे पोहोचणार आहे़
दहिसर पूर्व येथील मराठा कॉलनी रोडवर, क्रिस्टल प्राइड सभागृहात ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे़ स्वामी समर्थ कला नगर रहिवासी संघ आणि समता नगर स्थानिक रहिवासी मंडळाचाही यात सहभाग असणार आहे़
स्थानिक रहिवाशांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देणे हाच लोकमतचा उद्देश आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Loksatta your door in Dahisar