Join us  

कार्यकर्त्यांनो, यथेच्छ मारा वडापाववर ताव; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वस्त दरपत्रक जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 7:15 AM

निवडणूक खर्चाची अधिकृत मर्यादा ९५ लाख रुपये आहे.

संतोष आंधळेमुंबई : निवडणुकीत उमेदवारांनी प्रचारादरम्यान कुठल्या वस्तूसाठी किती खर्च करावा, याचे दर निवडणूक आयोग ठरवून देत असतो. त्याप्रमाणे मुंबई जिल्हाधिकारी आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी हे दर ठरवून दिले होते. मात्र, या दोन्ही दरांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत होती.

मुंबईतील वस्तूंचे दर हे उपनगरापेक्षा जास्त असल्याचे दिसून आले होते. याची गंभीर दखल घेऊन मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्वीच्या दरात सुधारणा करून उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या दरांशी सुसंगत नवीन सुधारित दर मंगळवारी जाहीर केले. निवडणूक खर्चाची अधिकृत मर्यादा ९५ लाख रुपये आहे.

पूर्वीचे जे दर होते ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आलेले प्रस्तावित दर होते. त्यानंतर आमच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याचा अभ्यास करून इतर ठिकाणी असणाऱ्या दरांची माहिती घेऊन हे नवीन दर अंतिम केले आहेत. - संजय यादव, जिल्हाधिकारी, मुंबई शहर

जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वस्त दरपत्रक जारी

वस्तू    आधीचे    सुधारित प्लास्टिक खुर्ची    २०- १०चहा    २०- १०कॉफी    २५-१२नाष्टा    ३०    २५वडापाव (प्रतिप्लेट)    २५-१५शाकाहारी जेवण    १००-११० मांसाहारी जेवण    २००- १४० पुलाव    १२०-७५पुरी भाजी    १२०- ६०पाणी जार (२० लि.)    १२० -८०यू पिन बॉक्स    १५- ६काडेपेटी    १०-१रबर बँड (१ किलो)    ३१०  - ५        (२५ नग)

नॉन एसी टॅक्सी(२४ तास, १०० किमी. प्रतिदिन रु.) आधी    २,४१५सुधारित    २,७७०

एसी - टॅक्सी(२४ तास, १०० किमी. प्रतिदिन रु.) आधी    २,५७४सुधारित    २,९६०

इनोव्हा एसी (२४ तास, १०० किमी. प्रतिदिन रु.) आधी    ४,९१०सुधारित    ५,०००

बस (५० आसनी प्रतिदिन, १०० किमी. रु.) आधी    ८,४६८सुधारित    ११,५००

हॉटेल दर (प्रतिदिन)    आधीचे    सुधारित नॉन एसी    २,५०० - १,६५०एसी    ३,५०० - ३,०००फोर स्टार हॉटेल    २५,०००-  २०,०००

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४