‘लोकमत’ करणार आदिशक्तीचा जागर, खेळ-मनोरंजनाची मेजवानी
By Admin | Updated: September 25, 2014 01:57 IST2014-09-25T01:57:19+5:302014-09-25T01:57:19+5:30
नऊ दिवस नऊ रंगांची उधळण करून आदिशक्तीच्या चैतन्यमय वातावरणात यंदा ‘लोकमत’ वृत्तपत्र समूह ‘उत्सव नवरात्रीचा’ ही संकल्पना घेऊन थेट नवरात्रौत्सव मंडळात येत आहे.

‘लोकमत’ करणार आदिशक्तीचा जागर, खेळ-मनोरंजनाची मेजवानी
मुंबई : नवरात्रौत्सव म्हणजे आदिमाया, आदिशक्ती अंबाबाईचा जागर... नऊ दिवस नऊ रंगांची उधळण करून आदिशक्तीच्या चैतन्यमय वातावरणात यंदा ‘लोकमत’ वृत्तपत्र समूह ‘उत्सव नवरात्रीचा’ ही संकल्पना घेऊन थेट नवरात्रौत्सव मंडळात येत आहे. नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत आपल्या कार्याने ठसा उमटविणाऱ्या महिलांना ‘स्पिरिट आॅफ दुर्गा’ हा किताब देऊन गौरविण्यात येणार आहे. नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मुंबईत नऊ ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नावीन्यपूर्ण खेळ आणि मनोरंजनाची खास मेजवानी घेऊन ‘लोकमत’ तुमच्यापर्यंत येणार आहे. देवीच्या आगमनाबरोबरच स्थानिक नागरिकांना वेगळा अनुभव यानिमित्ताने मिळेल. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक एक्स्प्रेशन आर्ट अॅकॅडमी ही शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था आहे.
२५ सप्टेंबर
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ, चिंचपोकळी, रात्री ८ वाजता.
२६ सप्टेंबर
कंट्री पार्क सोसायटी, बोरीवली, दुपारी ३ वाजता.
२७ सप्टेंबर
एम. आर. सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, अभुदयनगर, सायं. ७ वाजता.
२८ सप्टेंबर
जय माताजी मित्रमंडळ, चेंबूर सायं. ६ वाजता.
सर्वोदय नवरात्रौत्सव मंडळ, दादर, रात्री ८ वाजता.
२९ सप्टेंबर
साने गुरुजी पथ नागरिक नवरात्रौत्सव मंडळ, महालक्ष्मी, सायं. ५ वाजता.
३० सप्टेंबर
शिंदे वाडी नवरात्रौत्सव मंडळ, दादर, सायं. ७ वाजता.
नायगाव नवरात्रौत्सव मंडळ, नायगाव, रात्री ८ वाजता.
१ आॅक्टोबर
युथ कल्चरल फाउंडेशन, विलेपार्ले, रात्री ८ वाजता.