Join us

‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळा आज रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 06:12 IST

समारंभास विशेष अतिथी म्हणून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी उपस्थित असतील.

अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेला हा नेत्रदिपक सोहळा बुधवार, २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता वरळी येथील एनएससीआय डोममध्ये रंगणार असून, या सोहळ्याला दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून केंद्रीय रेल्वे व कोळसा मंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असेल. फडणवीस यांची बहारदार मुलाखत अभिनेते रितेश देशमुख घेणार असून हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण असेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा या समारंभात ‘पॉवर आयकॉन’ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांचे खास भाषण हा या समारंभाचा उत्सुकतेचा विषय असेल.

समारंभास विशेष अतिथी म्हणून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी उपस्थित असतील. त्यांना यावेळी ‘समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.  याच समारंभात भारत फोर्जचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष बाबासाहेब कल्याणी, जगविख्यात भारतीय शिल्पकार पद्मभूषण राम सुतार, अभिनेत्री दीपिका पदुकोण, चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेते रितेश विलासराव देशमुख, अभिनेते विकी कौशल, इस्त्रायलमध्ये प्रकाशित होणाऱ्या मायबोली या मराठी मासिकाचे संपादक नोह मासिल आणि क्रिकेटर स्मृती मानधना उपस्थित असणार आहेत. यावेळी दीपिका पदुकोण, विकी कौशल आणि रोहित शेट्टी यांच्याशी गप्पांची मैफल रंगणार आहे.लोकसेवा, समाजसेवा, वैद्यकीय, शिक्षण, नाटक, राजकारण, प्रशासन, परफॉर्मिंग आर्ट्स, चित्रपट, उद्योग, क्रीडाआणि सीएसआर अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रतिकूल परिस्थितीशी झगडत यशाची शिखरे पादाक्रांत करून अवघे विश्व मुठीतघेणाºया दिग्गज महारत्नांचा गौरव बुधवारी होणार आहे. निमित्त आहे ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार सोहळ्याचे. मान्यवरांच्या मुलाखती, भाषणे, गप्पांच्या रंगणाºया मैफली हे या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य..!फेसबुकवर लाइव्हहा कार्यक्रम लोकमत फेसबुक पेजवर तसेच www.lokmat.com या वेबसाइटवर लाइव्ह पाहता येईल. 

टॅग्स :लोकमतमुंबई