Join us  

LMOTY 2018: शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय पाटील यांना 'लोकमत'चा जीवनगौरव पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 8:34 PM

अविरत कार्य करणारे ज्येष्ठ नेते आणि शिक्षणप्रसाराचा वसा घेतलेले शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचा सन्मान

मुंबईः राजकारण हे समाजकारणाचं प्रभावी माध्यम आहे, हे ओळखून अविरत कार्य करणारे ज्येष्ठ नेते आणि शिक्षणप्रसाराचा वसा घेतलेले शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना आज 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'च्या पाचव्या पर्वात जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संजीव मेहता आणि सुनील बर्वे  यांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

'लोकमत'ने दिलेल्या जीवनगौरव पुरस्काराचे मोल मला पद्मश्री पेक्षा जास्त आहे. या गौरवामुळे मी अत्यंत आनंदी असून हा पुरस्कार सोहळा माझ्या कायम स्मरणात राहील, अशा भावना डी.वाय.पाटील यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केल्या.

कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून डी वाय पाटील यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला. त्यांच्या कामाचा वेग, नियोजन आणि दूरदर्शीपणा या जोरावर त्यांनी जनतेच्या मनात आणि काँग्रेस पक्षात स्वतःचं स्थान निर्माण केलं. १९६७ ते १९७८ या काळात ते महाराष्ट्राच्या विधानसभेत होते. एकीकडे राजकीय वाटचाल सुरळीत सुरू असतानाच, शिक्षणाचं महत्त्व जाणणाऱ्या डी वाय पाटील यांनी राज्यात शिक्षणसंस्थांचं जाळं विणलं. पुण्यातील डॉ. डी वाय पाटील या अभिमत विद्यापीठानं आज आपली पाळंमुळं घट्ट रोवली आहेत. त्याशिवाय, वैद्यकीय महाविद्यालयं, अभियांत्रिकी महाविद्यालयं, रुग्णालय या माध्यमातूनही डी वाय पाटील यांची संस्था जनतेसाठी कार्यरत आहे. या सामाजिक कार्याची दखल घेऊनच १९९१ साली त्यांना 'पद्मश्री'ने सन्मानित करण्यात आलं. 

टॅग्स :लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८राजकारणसमाजसेवक