‘Lokmat’ felicitates disruptors in society; Spontaneous response to ‘Jai Deva Sriganesha’ painting competition | समाजातील विघ्नहर्त्यांचा ‘लोकमत’तर्फे सत्कार; ‘जय देवा श्रीगणेशा’ चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

समाजातील विघ्नहर्त्यांचा ‘लोकमत’तर्फे सत्कार; ‘जय देवा श्रीगणेशा’ चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात राज्यभरातील गणेशोत्सव मंडळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘लोकमत’ने विघ्नहर्ता या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.आयओसीएल सर्वो स्कूटोमॅटिक आणि सर्वो फ्यूचुरा जी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमातून बऱ्याच प्रेरणादायक कहाण्या महाराष्ट्रासमोर आल्या.

मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी सांगितले की, महामारीचा विचार करता आम्ही रक्त आणि प्लाझ्मा दान शिबिर आयोजित केले. अनेक गणेश मंडळे, संस्था, समुदाय - अन्न, पीपीई किट, ऑक्सिजन सिलिंडर, देणगी इत्यादी देण्यासाठी पुढे आले.

‘महासेवा’चे अध्यक्ष रमेश प्रभू यांनी अनेक हाऊसिंग सोसायटी विलगीकरण केंद्र म्हणून आपले क्लब हाऊस देण्यास पुढे आल्याचे सांगितले. अभिनेत्री गिरीजा ओकने मुंबई आणि पुण्यामधील गणपती उत्सवाच्या आठवणी जागृत केल्या. समन्वय समितीचे नरेश दहिबावकर, पुण्याच्या गुरुजी तालीम मंडळाचे कार्याध्यक्ष पृथ्वीराज परदेश यांनीही उपस्थित ऑनलाईन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अभिनेत्री गौरी नलावडे हिने विजेत्यांची नावे जाहीर केली. सर्व प्रेरणादायी कार्यक्रम राबविणाऱ्यांना ‘लोकमत विघ्नहर्ता’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.याशिवाय ‘स्टार प्रवाह’च्या सहकार्याने घेतलेल्या ‘जय देवा, श्री गणेशा’ महाचित्रकला स्पर्धेत ६० हजार प्रवेशिका आल्या. विजेत्यांची चित्रे स्टार प्रवाह वाहिनीवर दाखवण्यात आली आणि त्यांना आकर्षक बिक्षसेही मिळाली.

लोकमत मीडियाने याव्यतिरिक्त ‘ग्लोबल सार्वजनिक गणेश उत्सव’ हा आगळावेगळा ऑनलाईन कार्यक्रम आयोजित केला होता. युरोप, अमेरिका, कॅनडा, कॅरिबियन बेटे, जर्मनी आणि मध्य पूर्व देश अशा १२ देशांतील लोकांनी आणि महाराष्ट्र मंडळांनी सामूहिक आरती व प्रार्थना केली. सर्वांनी आपल्या देशातील कार्यक्रमाची माहिती दिली. प्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वें यांनी गाण्यातून भक्तीभाव सादर केला. तर नंदेश उमप यांच्या गाण्यांनी आणि पोवाड्याने सर्वाना मंत्रमुग्ध केले. मुंबईतील लालबागचा राजा आणि पुण्यातील दगडूशेठ या प्रसिद्ध गणपती मंडळांच्या अध्यक्षांबरोबरही उपस्थितांनी संवाद साधला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीजा ओक यांनी केले. या कार्यक्रमास न्यू जर्सी , अमेरिका वरून सुमा फूड्सच्या हेमल ढवळीकरचे सहकार्य लाभले.

इंडियन ऑइल ही सार्वजनिक क्षेत्रातील एक प्रमुख आणि नामांकित कंपनी आहे. व्यावसायिक नीतीमूल्ये सांभाळत सामाजिक हित लक्षात घेऊन कंपनीची घौडदौड सुरू आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी समाजातील तळागाळातील माणसाचा विकास साधण्याचा दिलेला मूलमंत्र लक्षात ठेऊन व्यवस्थापन काम करते. सर्वांना समान संधी उपलब्ध व्हावी, यासाठी कंपनी कटीबद्ध आहे. त्यामुळे अनेक समाजोपयोगी उपक्रमांशी आम्ही जोडले गेलो आहोत. ‘लोकमत विघ्नहर्ता’ हा उपक्रम त्यापैकी एक आहे. श्रीमती अंजली भावे, जनरल

मॅनेजर, वेस्टर्न रीजन इंडियन ऑइल

विघ्नहर्ताचा कार्यक्र म पुन्हा पाहण्यासाठी http://bit.ly/LokmatVighnaharta ही लिंक वापरा.
देशविदेशातील मित्र परिवार आणि कुटुंबीयांना ग्लोबल सेलिब्रेशन पाहायचे असल्यास  http://bit.ly/LokmatGlobalGanesha ही लिंक वापरा.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ‘Lokmat’ felicitates disruptors in society; Spontaneous response to ‘Jai Deva Sriganesha’ painting competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.