Join us  

Lokmat Digital Influencer Awards 2021: कुणी मित्र, कुणी तत्त्वज्ञ, कुणी वाटाड्या; 'लोकमत' करणार Digital Influencers चा गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 4:40 PM

Lokmat Digital Influencer Awards 2021: यू-ट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम, जोश अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपलं मनोरंजन करणारे, आपल्याला काहीतरी शिकवणारे, प्रेरणा देणारे, आयुष्य बदलून टाकणारे बरेच Influencer आहेत. त्यापैकी काही जणांनी नेटिझन्सच्या मनात अगदी हक्काचं स्थान मिळवलंय

मुंबईः सोशल मीडिया! आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग. कोरोना संकटात सगळ्यांनाच या सोशल मीडियाने मोठा आधार दिला. काम, शिक्षण, फिटनेस, खेळ, बाजारहाट अशा विविध कारणांसाठी रोज घराबाहेर पडणारे आबालवृद्ध घरात बंदिस्त झाले आणि स्वाभाविकच 'बैठे बैठे क्या करें...' असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी सोशल मीडिया आणि चाकोरी मोडून या माध्यमांत मुशाफिरी करणारे शिलेदार मदतीला धावले. काहींसाठी मित्र, काहींसाठी तत्त्वज्ञ, तर काहींसाठी वाटाडे ठरलेल्या या 'डिजिटल इन्फ्लुएन्सर्स'चा सन्मान 'लोकमत'तर्फे करण्यात येणार आहे. आम्ही घेऊन येतोय, Lokmat Digital Influencer Awards 2021 हा सोहळा. लवकरच...

यू-ट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम, जोश अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपलं मनोरंजन करणारे, आपल्याला काहीतरी शिकवणारे, प्रेरणा देणारे, आयुष्य बदलून टाकणारे बरेच Influencer आहेत. त्यापैकी काही जणांनी नेटिझन्सच्या मनात अगदी हक्काचं स्थान मिळवलंय, एक विश्वासाचं नातं निर्माण केलंय. त्या जोरावर ते कोट्यवधी लाईक्स, लक्षावधी कमेंट्स जगभरातून व्ह्यूज मिळवत आहेत. या 'हिरों'चा गौरव लोकमत डिजिटल इन्फ्लूएन्सर अवॉर्डने करण्यात येणार आहे. २ डिसेंबर रोजी मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये हा सोहळा रंगणार आहे.   

सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला एकत्र जोडण्यात डिजिटल इन्फ्लूएन्सरचा मोठा वाटा आहे. सोशल मीडियाला त्यांनी संवादाचं प्रभावी माध्यम बनवलं. व्यापार, उद्योगाच्या नव्या संधींबरोबरच सामाजिक संदेश देण्यातही त्यांची भूमिका राहिली आहे. त्यांना एका व्यासपीठावर आणून सन्मान करण्याबरोबरच नेटवर्किंगची संधी देण्यात येणार आहे. 

या सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट, पत्रकार फे डिसुझा, जगप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांची विशेष उपस्थिती असेल. 

या पुरस्कार सोहळ्याचा पास मिळवण्यासाठी क्लिक करा!

जोश शॉर्ट व्हिडीओ ॲप हे कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये लॉन्च झालेलं हे ॲप पूर्णपणे भारतीय असून देशात सर्वाधिक वेगाने वाढत आहे. प्ले स्टोअरवर ते आत्तापर्यंत १०० मिलियनहून अधिक डाऊनलोड झालं असून १४ भारतीय भाषांमध्ये ते उपलब्ध आहे. 

जोश शॉर्ट व्हिडीओ ॲप इन्स्टॉल करण्यासाठी क्लिक करा!

२५ कॅटेगरीतील विजेत्यांचा होणार सन्मान

लोकमत डिजिटल इन्फ्लूएन्सर अवॉर्डमध्ये फुड, कोरिओग्राफी, ह्युमर, मोस्ट व्हायरल कंटेन्ट, स्पिरिच्युअल, जर्नालिझम, ब्युटी, ट्रॅव्हल, फॅशन, बॉलिवूड, फोटोग्राफी, म्युझिक, फिटनेस, आर्ट अँड कल्चर, किड्स, ऑटोमोबाईल, फायनान्स, लाईफस्टाईल यासारख्या २५ कॅटेगरीतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. ओरिजल कंटेन्ट, फॉलोअर्स, कमेंट्स, लाईक्स, व्ह्यूज या निकषांच्या आधारे ही निवड केली जाणार आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, यू-ट्युब, जोश ॲप, ट्विटरवरील इन्फ्लूएन्सचा विचार करून लोकमत एडिटोरियल बोर्डाकडून विजेत्यांची निवड होईल. 

टॅग्स :लोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१प्रिया बापटफेसबुकयु ट्यूब