Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोकमान्य टिळक टर्मिनसवर साकेत एक्स्प्रेसमुळे प्रवाशांचे अतोनात हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 07:12 IST

सकाळी 5.25 वाजता सुटणारी ही ट्रेन तब्बल 2 तास 35 मिनिटे खोळंबून होती. 

मुंबई- मुंबई-फैजाबाद साकेत एक्स्प्रेसमुळे हजारो प्रवाशांचे लोकमान्य टिळक टर्मिनसवर हजारो प्रवाशांचे अतोनात हाल झाले. एलटीटी येथून सकाळी 5.25 वाजता सुटणारी ही ट्रेन तब्बल 2 तास 35 मिनिटे खोळंबून होती. विशेष म्हणजे यार्डात गाडी तयार नसल्याचे उद्घोषणेद्वारे सांगण्यात येत होते. त्यामुळे अनेक प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले. यात वृद्ध, लहान मुले यांचे जास्त हाल झाले. ट्रेनची वेळ उलटूनही ट्रेन प्लॅटफॉर्मवर का आली नाही, हे नेमकेपणाने सांगण्यात येत नव्हते. त्यामुळे गोंधळात अजून भर पडली. मुंबईत जोरदार पाऊस झालेला असताना अशा प्रकारची परिस्थिती उदभवते, असा अनुभव प्रवाशांना आहे. तथापि, मुंबई पूर्णपणे कोरडी असताना झालेला हा विलंब प्रवाशांसाठी अनाकलनीय आणि गोंधळात टाकणारा होता. मध्य रेल्वेच्या ढेपाळलेल्या प्रशासनाकडून या दिरंगाईची तातडीने दखल घ्यायला हवी, अशी अपेक्षा अनेक प्रवाशांनी व्यक्त केली.

टॅग्स :रेल्वेरेल्वे प्रवासी