लोकमतचे मुख्य संपादक राजेंद्र दर्डांना ‘पुरस्कार’
By Admin | Updated: May 14, 2015 22:51 IST2015-05-14T22:51:37+5:302015-05-14T22:51:37+5:30
नागपूरमधील झीरो माइल्स चौकामध्ये वृत्तपत्र विक्रेत्याचा पुतळा उभारल्याबद्दल व त्यांच्या कल्याणासाठी केलेल्या प्रयत्नांचा गौरव म्हणून लोकमतचे

लोकमतचे मुख्य संपादक राजेंद्र दर्डांना ‘पुरस्कार’
ठाणे : नागपूरमधील झीरो माइल्स चौकामध्ये वृत्तपत्र विक्रेत्याचा पुतळा उभारल्याबद्दल व त्यांच्या कल्याणासाठी केलेल्या प्रयत्नांचा गौरव म्हणून लोकमतचे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा यांना ठाणे जिल्हा वृत्तपत्रविक्रेता संघातर्फे ‘जीवनगौरव’ पुरस्कार बुधवारी देण्यात आला. संघाच्या सोळाव्या वर्धापन दिन सोहळ्यात हा पुरस्कार त्यांच्या वतीने लोकमतच्या ठाणे आवृत्तीचे निवासी संपादक नंदकुमार टेणी यांनी महापौर संजय मोरे यांच्या हस्ते स्वीकारला.
या वेळी व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष कैलाश म्हापदी आणि सरचिटणीस अजित पाटील हेही होते. ठाणे जिल्हा वृत्तपत्रविक्रेता संघाचा सोळावा वर्धापन दिन आणि कौटुंबिक स्नेहसंमेलन बुधवारी सायंकाळी ठाणे पूर्व येथील राऊत शाळेमध्ये पार पडले.
या वेळी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या ४० संघटनांचे प्रतिनिधी, वृत्तपत्र विक्रेत्यांचे कुटुंबीय असे उपस्थित होते. स्वरगंधा या कार्यक्रमाचेही आयोजन या वेळी करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी संघाचे पदाधिकारी व सदस्य नंदू देशपांडे, शंकर दुधाणे, राजू शेलार, अशोक कदम, अशोक यादव, भास्कर ठावरे, कुमार बडदे, संदीप आवारे, संजय बोराडे, संतोष खामकर, राजू कुटे, गुरुनाथ चिंचोले, ताजू शेख, मोहन मोरे, जयेश पितळे, चंद्रकांत पवार, सुदेश मेहता, सुशील मेहता, संजय भुजबळ, किरण सालीयान, पांचाळ, परग, विनायक गिजे, नंदू करले, रवी कर्डिले, भरत कुथे, बामले, विलास पिंगळे, केशव शिर्के, कैलास पाटेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.