परिवहन विभागातील भ्रष्टाचाराची आज लोकायुक्तांकडे सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:13 IST2021-09-02T04:13:36+5:302021-09-02T04:13:36+5:30

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्र खरेदी आणि संगणकीकृत आरक्षण व्यवस्थेच्या निविदा प्रक्रियेतील कथित घोटाळ्याची आज (गुरुवारी) ...

Lokayukta hearing on corruption in transport department today | परिवहन विभागातील भ्रष्टाचाराची आज लोकायुक्तांकडे सुनावणी

परिवहन विभागातील भ्रष्टाचाराची आज लोकायुक्तांकडे सुनावणी

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्र खरेदी आणि संगणकीकृत आरक्षण व्यवस्थेच्या निविदा प्रक्रियेतील कथित घोटाळ्याची आज (गुरुवारी) लोकायुक्तांकडे सुनावणी होणार आहे. ऑनलाइन पद्धतीने ही सुनावणी होणार आहे. भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी हा मुद्दा उपस्थित करत परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

राज्य परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्र खरेदी आणि संगणकीकृत आरक्षण व्यवस्थेच्या निविदा प्रक्रियेत २५० कोटींचा घोटाळा झाला असून, त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार कोटेचा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.

राज्यपालांच्या निर्देशानंतर प्रभारी लोकायुक्तांनी या अनुषंगाने चौकशी सुरू केली. याप्रकरणी आज दुपारी बारा वाजता ऑनलाइन पद्धतीने सुनावणी घेण्यात येणार असून, राज्याच्या मुख्य सचिवांनाही याबाबत कळविण्यात आले आहे.

स्वतःच्या मर्जीतील गुजरातमधील एका विशिष्ट कंपनीला कंत्राट देण्याच्या उद्देशाने परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी निविदा प्रक्रियेतील अटींमध्ये बदल केल्याचा आरोप आमदार कोटेचा यांनी जून महिन्यात जाहीर पत्रकार परिषदेत केला होता. बदललेल्या अटींनुसार निविदा मंजूर झाल्यास परिवहन महामंडळाला विनाकारण २५० कोटींचा भुर्दंड बसणार असल्याचेही कोटेचा यांनी म्हटले होते.

Web Title: Lokayukta hearing on corruption in transport department today