थायलंड येथे लगोरी कार्यशाळा

By Admin | Updated: December 10, 2014 22:30 IST2014-12-10T22:30:05+5:302014-12-10T22:30:05+5:30

देशात चीयांगराय या ठिकाणी विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये लगोरी या खेळाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

Logori Workshop at Thailand | थायलंड येथे लगोरी कार्यशाळा

थायलंड येथे लगोरी कार्यशाळा

नागोठणो : आंतरराष्ट्रीय लगोरी महासंघ व थायलंड लगोरी संघटनेच्या वतीने 3 ते 7 डिसेंबर दरम्यान थायलंड या देशात चीयांगराय या ठिकाणी विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये लगोरी या खेळाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. समाखी विथ्याखोम स्कूलच्या क्रीडा संकुलात व  प्रिन्सेस  मदर स्कूलमधील सुमारे आठ हजार विद्याथ्र्याना लगोरीचे प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यशाळेचे आयोजन कुल्वील मुरली मेनन यांच्या सहकार्यातून शाळेचे संचालक डॉ. तावत चमचोब व  मिस सुपावन खामवांग यांनी केले होते.  लगोरी या खेळाच्या प्रशिक्षणानंतर या खेळाचे सामने देखील घेण्यात आले. विजेत्या  संघाला व उत्कृष्ट कामगिरी करणा:या खेळांडूना लगोरीचा सेट बक्षीस स्वरुपात लगोरी महासंघाच्या वतीने देण्यात आला.  हे प्रशिक्षण  भारतीय लगोरी संघटनेचे तांत्रिक मार्गदर्शक शैलेंद्र पोतनीस यांनी दिले होते. थायलंड या देशातील सर्व ठिकाणी जावून  लगोरीचा प्रचार व प्रसार संतोष गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. बक्षीस वितरणप्रसंगी डॉ. तावत चमचोब यांनी लगोरी हा खेळ खेळाडूचा शारीरिक विकास करणारा आणि कमी खर्चिक असून चपळतेचे उदाहरण देणारा आहे. लगोरी खेळल्याने आमच्या  शाळेतील विद्यार्थी चपळ व कार्यक्षम बनतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
लगोरीला कुठल्याही प्रकारच्या अत्याधुनिक सोयी-सुविधांची जास्त प्रमाणात गरज नाही. लगोरी हा खेळ 5 वर्षापासून कितीही वर्षाचा खेळाडू सहजरीत्या खेळू शकतो. खेळाचे बारकावे शिकण्यासाठी थायलंडचे खेळाडू 27 ते 3क् जानेवारी रोजी कर्नाटकात  होणा:या इंडियन लगोरी प्रीमियम लीगमध्ये सहभागी होतील, असेही चमचोब यांनी सांगितले. 
 
थायलंडमध्येही लोकप्रिय : लगोरी थायलंडमध्येही लोकप्रिय करण्याचा प्रयत्न आहे. भारतात मुंबईमध्ये 24 ते 3क्  डिसेंबर 2क्15 दरम्यान होणा:या लगोरी वल्र्ड कप स्पर्धेत आमच्या देशाचे खेळाडू सहभागी होवून निश्चितच चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास चमचोब यांनी केला. 25 जानेवारी ते 1क् फेब्रुवारी 2क्15 पर्यंत लगोरीचे बारकावे शिकण्यासाठी संघ भारतात येणार असून आंतरराष्ट्रीय लगोरी महासंघाच्या वतीने पुणो, मुंबई, दिल्ली, आग्रा आदी ठिकाणी सराव सामने खेळणार आहे. 

 

Web Title: Logori Workshop at Thailand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.