लॉकडाऊनमध्येही दमलेल्या बाबाची कहाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 05:06 PM2020-04-06T17:06:45+5:302020-04-06T17:07:06+5:30

मुलांच्या कलाने वागताना वडिलांची दमछाक

Locked-down daddy's story too! | लॉकडाऊनमध्येही दमलेल्या बाबाची कहाणी !

लॉकडाऊनमध्येही दमलेल्या बाबाची कहाणी !

Next

 

मुंबई - असा कसा बाबा देव लेकरांना देतो, लवकर जातो आणि उशिराने येतो. . . आपल्या मुलांना वेळ देऊ न शकणा-या दमलेल्या बाबाच्या या कहाणीने अनेकांच्या डोळ््यात पाणी तरळते. मात्र, लॉकडाऊनमुळे २४ तास घरात असलेला याच बाबाची मुलांच्या कलाने वागताना पुरती दमछाक झाल्याचे दिसते. वर्क फॉम होम, संभाव्य आर्थिक संकट, त्यातून येणारे नैराश्य, कौटुंबिक कुरबूरी आणि मुलांच्या ऊर्जेपुढे येणारे तोकडेपण अशा असंख्य कारणांमुळे दमलेल्या बाबाची कहाणी संपलेली दिसत नाही.
 

२१ मार्च रोजी लॉकडाऊन झाल्यानंतर प्रत्येक जण एकप्रकारे घरांतच कैद झाला आहे. एवढे दिवस कुटुंबातील सर्व जण २४ तास एकत्र राहण्याचा हा प्रसंग तसा अभूतपुर्वच आहे. कधी नव्हे तो योग जुळून आल्याने प्रत्येक जण आनंदी होते. मात्र, पंधरवड्यानंतर ज्या घरांमध्ये दहा ते बारा वर्षे वयोगटापर्यंतची मुले आहेत तिथल्या पालक कातावलेले दिसतात. माझा मुलगा शाळा, शिकवण्या आणि अन्य छंदवर्गांमध्ये एवढा गुंतलेला होता की दिवसांतले किमान १२ तास तो घराबाहेरच असायचा. लॉकडाऊनमुळे हे सर्व बंद झाले असून या मुलांच्या दिवसभर गुंतवून ठेवण्याची कला माझ्यात नाही असे कपिल महाजन यांनी सांगितले. सुरवातीला आम्ही घरात कॅरम, पत्ते, बुध्दिबळ यांसारखे खेळ खेळायचो. पण, आता मुलांना आणि मलाही त्याचा कंटाळा आल्याचे संकेत कानडे म्हणाले. माझ्या मुलाला सतत घरात क्रिकेट खेळायचे असते. तासभर खेळल्यानंतर मी दमतो. त्याच्याएवढी एनर्जी माझ्यात नाही असे पारस मवानी यांनी सांगितले.

मुलांना सतत अभ्यास कर असे सांगू शकत नाही. अभ्यासानंतरच्या वेळात त्यांना सांभाळÞणे हे मोठे आव्हान आहे. बायको घरातल्या कामात असल्याने ती जबाबदारी माझ्यावरच आहे. वेळ दिला नाही मुलं मोबाईल हातात घेतात किंवा टीव्हीसमोर बसतात. हे प्रमाण वाढणे योग्य नसल्याचे आम्हाला पटते. परंतु, घरातून करावे लागणारे आॅफिसचे काम आणि भवितव्याची चिंता असल्याने मुलांना क्वालिटी टाईम देता येत नसल्याचे राजेश पोटे यांनी मान्य केले. त्यातून घरांतली चिडचिड वाढल्याचे यापैकी प्रत्येकानेच मान्य केले.

संयमाचा आॅक्सिजन मास्क हवा
उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्याच्या काळात ते घरात कैद झालेले आहेत. त्यांच्या भावना समजून घ्यायला हव्यात मुलं घराबाहेर पडू शकणार नाही हे प्रत्येकाला माहित आहे. त्यामुळे त्यांच्या दिवसाचे टाईम टेबल ठरवून घ्या. त्यानुसार पालकांनी आपल्या कामाच्या वेळा ठरवून घ्याव्या. भावना बिघडणे हा संसर्गजन्य प्रकार आहे. पालक संतापले की मुलंसुध्दा चिडतात. त्यातून नाहक कौटूंबिक कलह निर्माण होतात. ते टाळण्यासाठी पालकांनी कायम संयमाचे आॅक्सिजन मास्क वापरावे. मुलांसोबत सहसंवेदना ठेवली तर लॉकडाऊनच्या काळात घरातील प्रत्येकाचेच मानसिक संतूलन कायम राहिल.
- डॉ. संदीप केळकर, भावनीक बुद्धिमत्ता विशेषज्ञ

Web Title: Locked-down daddy's story too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.