लोकलला स्वयंचलित दरवाजा बसणार

By Admin | Updated: June 17, 2015 03:07 IST2015-06-17T03:07:29+5:302015-06-17T03:07:29+5:30

महिला प्रवाशांच्या फर्स्ट क्लास डब्याला स्वयंचलित दरवाजा बसवण्याचा प्रयोग पश्चिम रेल्वेवर करण्यात आला. यात महिला प्रवाशांचा चांगला

The locals will have an automatic door | लोकलला स्वयंचलित दरवाजा बसणार

लोकलला स्वयंचलित दरवाजा बसणार

मुंबई : महिला प्रवाशांच्या फर्स्ट क्लास डब्याला स्वयंचलित दरवाजा बसवण्याचा प्रयोग पश्चिम रेल्वेवर करण्यात आला. यात महिला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता पुरुष प्रवाशांची गर्दीत कसोटी लागणार आहे. कारण सेकंड क्लास पुरुष प्रवाशांच्या डब्याला स्वयंचलित दरवाजा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, रेल्वे बोर्डाने पश्चिम रेल्वेला मंजुरीही दिली आहे.
लोकलमधून पडून अनेक प्रवासी मृत्युमुखी पडतात. गर्दीच्या वेळी अनेकांना लोंबकळून प्रवास करावा लागतो. हे पाहता लोकलच्या डब्यांना स्वयंचलित दरवाजा बसवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. त्यानुसार पश्चिम रेल्वेवरील एका लोकलच्या एका फर्स्ट क्लास महिला डब्याला स्वयंचलित दरवाजा बसवून त्याची चाचणी घेण्यात आली. गेल्या दोन महिन्यांपासून ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर आणखी एक निर्णय पश्चिम रेल्वेकडून घेण्यात आला आहे. या संदर्भातील पश्चिम रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली असून, आता लोकलमधील पुरुषांच्या सेकंड क्लास डब्याला स्वयंचलित दरवाजा बसेल, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन यांनी सांगितले. सध्या ज्या लोकलच्या महिला प्रवाशांच्या डब्याला स्वयंचलित दरवाजा बसवण्यात आला आहे, त्याच लोकलच्या किंवा दुसऱ्या लोकलच्या एकाच सेकंड क्लास पुरुष प्रवाशांच्या डब्याला हा दरवाजा बसवण्यात येईल.

येत्या तीन महिन्यांत स्वयंचलित दरवाजांची लोकल दाखल होईल. फक्त प्रायोगिक तत्त्वावर हा दरवाजा बसवून त्याला मिळणारा प्रतिसाद बघितला जाईल. - चंद्रायन

Web Title: The locals will have an automatic door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.