लोकलचा ब्रेक लागलाच नाही

By Admin | Updated: November 19, 2015 08:25 IST2015-11-19T02:42:00+5:302015-11-19T08:25:23+5:30

सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या एका लोकलमध्ये माटुंगा येथे मोटरमनकडून ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला असता, तो अयशस्वी ठरला आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी असणाऱ्या

The locals did not break | लोकलचा ब्रेक लागलाच नाही

लोकलचा ब्रेक लागलाच नाही


मुंबई : सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या एका लोकलमध्ये माटुंगा येथे मोटरमनकडून ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला असता, तो अयशस्वी ठरला आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी असणाऱ्या तीन ब्रेकपैकी दुसरा ब्रेक लागल्याने अनर्थ टळला. या लोकलमधील ब्रेक यंत्रणेच्या एका केबलमध्ये मोठ्या प्रमाणात लाल मुंग्या आढळण्याबरोबरच केबल इन्सुलेटर नादुरुस्त असल्याचे मोटरमनच्या निदर्शनास आले आणि त्यामुळे लोकलच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न पुढे आला. ही घटना मंगळवारी दुपारी १ च्या दरम्यान घडल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
कल्याणहून सीएसटीच्या दिशेने लोकल जात असताना मोटरमनकडून माटुंगाजवळ येताच ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, ब्रेक लागत नसल्याने मोटरमनकडून त्वरित मॅकेनिकल ब्रेक लावण्यात आला आणि ही लोकल काही अंतरावर जाऊन थांबली. लोकलमध्ये तीन प्रकारचे ब्रेक असतात आणि पहिला ब्रेक न लावल्यास दुसऱ्या किंवा तिसऱ्या ब्रेकचा वापर केला जातो. या घटनेत दुसरा ब्रेक लागल्याने मोठा अनर्थ टळल्याची चर्चा होत आहे. ही ट्रेन त्यानंतर सीएसटी स्थानकापर्यंत आल्यानंतर त्याची तपासणी केली असता, ब्रेकशी यंत्रणेच्या केबलमध्ये मोठ्या प्रमाणात मुंग्यांचा वावर असतानाच बिघाड झाल्याचे निदर्शनास आले.

 

Web Title: The locals did not break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.