मुंबई- मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात पॉइंट फेल झाल्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या मार्गाची वाहतूक विस्कळीत झाली. मध्य रेल्वेशी याबाबत संपर्क साधला असता अद्याप माहिती घेत असल्याचे सांगितले. यावरून लोकल मार्गावर झालेल्या तांत्रिक बिघाडाबाबत मध्य रेल्वे प्रशासन अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट होते. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दादर स्थाकातील पॉइंट बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. आज सकाळी ४:५७ मिनिटांनी पुणे दिशेकडे जाणाऱ्या डाऊन लाइनवर मंकी हिल ते खंडाळा या स्टेशनदरम्यान मालगाडी ब्रेकवॅन डबा रुळावरून घसरला आहे.
मध्य रेल्वेवरील सायन-माटुंगा दरम्यान लोकलचा खोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 17:01 IST