पूर्व उपनगरातील गुंडावर स्थानबद्धतेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:07 IST2021-09-26T04:07:24+5:302021-09-26T04:07:24+5:30

मुंबई : पूर्व उपनगरात चेंबूर, देवनार, गोवंडी, टिळकनगर परिसरात गुन्हेगारी टोळी चालवून दहशत निर्माण केलेल्या गुंड सिद्धार्थ शशिकांत वाकोडे ...

Localization action against goons in the eastern suburbs | पूर्व उपनगरातील गुंडावर स्थानबद्धतेची कारवाई

पूर्व उपनगरातील गुंडावर स्थानबद्धतेची कारवाई

मुंबई : पूर्व उपनगरात चेंबूर, देवनार, गोवंडी, टिळकनगर परिसरात गुन्हेगारी टोळी चालवून दहशत निर्माण केलेल्या गुंड सिद्धार्थ शशिकांत वाकोडे (२७) याला ताब्यात घेऊन ठाणे मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. ही कारवाई एमपीडीए कायदा १९८१ अन्वये परिमंडळ सहाच्या उपायुक्तांनी केली.

सिद्धार्थ वाकोडे याच्यावर २०१४ पासून देवनार, मानखुर्द, गोवंडी पोलीस ठाण्यात, खुनाचा प्रयत्न, मारामारी, आदी गुन्हे दाखल आहेत. १४ मे रोजी त्याने सहकाऱ्यांसमवेत सोहेल इनामदार याच्या घरात शिरून त्याला व आईला मारहाण करून दमदाटी केली होती. त्यावेळी त्याला अटक केल्यानंतर त्याच्याविरुद्धचे अन्य गुन्हे उघडकीस आले. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही तो सुधारत नसल्याने एमपीडीए कायद्यांतर्गत विघातक कृत्यांना लगाम घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. परिमंडळ -६ मधील या वर्षातील ही दुसरी कारवाई आहे. ट्रॉम्बे पोलीस ठाण्यांतर्गत आरोपी नौशाद ऊर्फ नजीर ऊर्फ नासीर सलीम खान याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Localization action against goons in the eastern suburbs