मुंब्रा स्थानकाजवळ लोकलना वेगमर्यादा
By Admin | Updated: November 16, 2015 02:33 IST2015-11-16T02:33:40+5:302015-11-16T02:33:40+5:30
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील बोगद्याजवळ लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू होत असल्याच्या घटना घडत आहेत. या घटना बोगद्याजवळील एका खांबाला बॅगा अडकून तसेच खांब लागून होत

मुंब्रा स्थानकाजवळ लोकलना वेगमर्यादा
मुंबई : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील बोगद्याजवळ लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू होत असल्याच्या घटना घडत आहेत. या घटना बोगद्याजवळील एका खांबाला बॅगा अडकून तसेच खांब लागून होत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत असल्याने या स्थानकादरम्यान वेगमर्यादा घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंब्रा ते कळवादरम्यान एक मोठा बोगदा असून, या बोगद्याजवळ रेल्वेकडून तांत्रिक कामांसाठी नवा खांब बसवण्यात आला आहे. मात्र हा खांब रेल्वेमार्गाच्या जास्त जवळ असल्याने गर्दीच्या वेळी प्रवास करताना लोकलच्या दरवाजाजवळ उभे असलेल्या प्रवाशांना त्याचा फटका बसतो आणि प्रवासी जखमी होतात. काही घटनांमध्ये तर या खांबाचा फटका लागून लोकलमधून पडून प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. ५ नोव्हेंबर रोजी या ठिकाणी ३ तर ७ नोव्हेंबर रोजी २ प्रवासी लोकलमधून पडून मृत्युमुखी पडले. या घटनांनंतर स्थानिकांकडून आंदोलनाचेही हत्यार उपसण्यात आले. या घटनेची दखल घेत मध्य रेल्वेकडून तीन अधिकाऱ्यांची एक समितीही नेमण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंब्राजवळ ताशी ५0 किलोमीटर वेगमर्यादा घालण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.