लोकलच्या महिला बोगीत शौचालय उभारा, अरविंद सावंत यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 03:22 IST2018-02-16T03:22:00+5:302018-02-16T03:22:11+5:30
उपनगरीय लोकल मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कल्याण-क सारा-कर्जत आणि पश्चिम रेल्वेवर डहाणूपर्यंत धावते. यामुळे महिला प्रवाशांसाठी लोकलच्या महिला बोगीत शौचालय उभारण्याची मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. सीएसएमटी येथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के.शर्मा यांनी खासदरांची बैठक गुरुवारी बोलावली होती.

लोकलच्या महिला बोगीत शौचालय उभारा, अरविंद सावंत यांची मागणी
मुंबई : उपनगरीय लोकल मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कल्याण-क सारा-कर्जत आणि पश्चिम रेल्वेवर डहाणूपर्यंत धावते. यामुळे महिला प्रवाशांसाठी लोकलच्या महिला बोगीत शौचालय उभारण्याची मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. सीएसएमटी येथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के.शर्मा यांनी खासदरांची बैठक गुरुवारी बोलावली होती. यावेळी सावंत यांनी ही मागणी केली. बैठकीत मुंबई रेल्वे विकास मंडळाचे अधिकारी देखील उपस्थित होते. उपनगरीय लोकलला जर एसी बसवता येणे शक्य आहे. तर महिला बोगीत शौचालय का बसवले जात नाही ? असा प्रश्न सावंत यांनी बैठकीत उपस्थित केला. चर्चगेट ते विरार,डहाणू आणि सीएसएमटी ते कसारा-कर्जत जाण्यासाठी दोन-तीन तास लागतात. यामुळे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने लोकलमध्ये शौचालयांसाठी जागा करावी. त्याच बरोबर स्थानकांवरील पादचारी पूलांना पूर्व-पश्चिम जोडणी द्यावी अशी ही मागणी सावंत यांनी केली.
- सीएसएमटी येथे शिवाजी महाराजांचा पुतळा फलाट क्रमांक १८ जवळ उभारण्याच्या रेल्वेच्या निर्णयावर अरविंद सावंत यांनी नाराजी व्यक्त केली. शिवाजी महाराजांचा पुतळा हा सीएसएमटीच्या मागच्या बाजूला नाही तर समोरच्या बाजूलाच असला पाहिजे, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.