स्थानिक वाहनांना टोलमाफी मिळणार

By Admin | Updated: July 10, 2014 00:25 IST2014-07-10T00:25:20+5:302014-07-10T00:25:20+5:30

पनवेल-सायन महामार्गावर खारघर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या टोलनाक्यावर स्थानिक वाहनांना सूट मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Local vehicles will get tolls | स्थानिक वाहनांना टोलमाफी मिळणार

स्थानिक वाहनांना टोलमाफी मिळणार

पनवेल : पनवेल-सायन महामार्गावर खारघर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या टोलनाक्यावर स्थानिक वाहनांना सूट मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनावर दबाव आणल्याने गुरूवारी याबाबत  मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली आहे. यावेळी वरील घोषणा होण्याची शक्यता असल्याचे एका उच्चपदस्थ अधिका:याने सांगितले. दरम्यान, याबाबत निर्णय झाला नाही तर टोलमाफ होईर्पयत आंदोलन करण्याची तयारी  काँग्रेसच्या नेत्यांनी दर्शवली आहे. 
पनवेल-सायन महामार्ग दहा पदरी करण्यात आला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने खारघर आणि कामोठे येथे टोलनाके उभारले आहेत. त्या ठिकाणी लवकरच टोल वसुली करण्यास सुरूवात करण्यात येणार आहे. हा महामार्ग मुंबई ते पुणो प्रवास करणा:यांसाठी प्रशस्त करण्यात आला आहे. त्याचा पनवेल परिसरातील रहिवाशांना फारसा फायदा नाही. त्याचबरोबर वाशी टोलनाका फक्त 2क् कि.मी. अंतरावर असताना खारघर  येथे टोल आकारणो गैर आहे. या टोलनाक्याला सर्वच राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला आहे.  काँग्रेसने 11 जुलै रोजी टोलविरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 
एमएच 46 आणि क्6 या वाहनांना टोलमाफी देण्यासंदर्भात ठाकूर यांनी मागणी केली आहे.  त्यानुसार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी 10 जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आणि अधिका:यांची बैठक बोलवली असून याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
 
ठेकेदाराचेही धाबे दणाणले 
4एकूण 12क्क् कोटी रूपये खर्च करून पनवेल - सायन महामार्गाचे रूंदीकरण करण्यात आले आहे. बीओटी तत्त्वावर हे काम करण्यात आले असून हे पैसे वसूल करण्यासाठी कोपरा आणि कामोठे या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने टोल नाके उभारले आहेत. दरम्यान, स्थानिकांना या टोलमधून वगळा  ही मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरत आहे. पनवेल तालुका नागरिकांनी या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे 11 जुलै रोजी करण्यात येणा:या रास्ता रोकोला मोठा जनसमुदाय येणार आहे. त्यामुळे ठेकेदाराचेही धाबे दणाणले आहे.

 

Web Title: Local vehicles will get tolls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.