Join us

Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 12:42 IST

मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादरवरून सुटणाऱ्या डाउन मेल/एक्स्प्रेस ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान ५व्या मार्गावर वळवल्या जातील.

मुंबई : मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी १०:४० ते दुपारी ३:४० पर्यंत अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादरवरून सुटणाऱ्या डाउन मेल/एक्स्प्रेस ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान ५व्या मार्गावर वळवल्या जातील. तर अप मेल/एक्स्प्रेस कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान ६व्या मार्गावर वळवल्या जातील.

हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट लाइन वगळून) अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११:०५ ते दुपारी ४:०५ पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.  

ब्लॉक कालावधीत पनवेल आणि सीएसएमटी दरम्यान, ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल-ठाणे मार्गावर सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी - वाशी विभागात विशेष लोकल चालवल्या जातील. तर ठाणे-वाशी/नेरूळ स्टेशन दरम्यान ट्रान्स-हार्बर सेवा उपलब्ध राहतील.

टॅग्स :मुंबई लोकल मेगा ब्लॉकमुंबई लोकलमध्य रेल्वेहार्बर रेल्वेभारतीय रेल्वे