Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोकल प्लॅटफॉर्म सोडून थांबली; प्रवाशांची तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 11:09 IST

Mumbai Local News: मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सायंकाळी ५:२२ वाजता सुटणाऱ्या बदलापूर जलद लोकलने शुक्रवारी विक्रोळी रेल्वे स्थानक येथील नियोजित थांबा चुकवला. प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर न थांबल्याने गार्डने आपत्कालीन ब्रेक लावत गाडी थांबवली. तोपर्यंत लोकलचे चार डबे प्लॅटफॉर्मच्या पुढे गेले होते.

मुंबई -  मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सायंकाळी ५:२२ वाजता सुटणाऱ्या बदलापूर जलद लोकलने शुक्रवारी विक्रोळी रेल्वे स्थानक येथील नियोजित थांबा चुकवला. प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर न थांबल्याने गार्डने आपत्कालीन ब्रेक लावत गाडी थांबवली. तोपर्यंत लोकलचे चार डबे प्लॅटफॉर्मच्या पुढे गेले होते.

विक्रोळी स्थानकावर काही जलद लोकलना ठरावीक थांबे आहेत. त्यापैकीच ५:२२ वाजताची बदलापूर जलद लोकल ही भायखळा, दादर, कुर्ला, विक्रोळी, ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि पुढील सर्व स्थानकांवर थांबते. मात्र, सायंकाळी सुमारे ५:५२ वाजता विक्रोळी स्थानकात दाखल झाल्यानंतर ही गाडी न थांबल्याचे लक्षात येताच गार्डने आपत्कालीन ब्रेक लावला. परंतु या ठिकाणी प्रवाशांना उतरता न आल्याने ज्या प्रवाशांना विक्रोळीत उतरायचे होते, त्यांच्यासाठी भांडुप रेल्वे स्थानक येथे थांबा देण्यात आला. भांडुप स्थानकात ही लोकलथांबवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

मोटरमनचे प्रशिक्षण, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह  मध्य आणि पश्चिम रेल्वेवर अलीकडे लोकलचे डबे प्लॅटफॉर्म सोडून पुढे गेल्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. यापूर्वी घाटकोपर रेल्वे स्थानक येथे ११ मार्च २०२६ रोजी वातानुकूलित जलद लोकल थांबा असतानाही पुढे गेली होती.  ७ एप्रिल रोजी भाईंदर रेल्वे स्थानक येथे विरार-वडाळा लोकलने थांबा चुकवला होता. या घटनांमुळे मोटरमनच्या प्रशिक्षणावर  आणि प्रवासी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Local Train Overshoots Platform; Passengers Stranded and Inconvenienced

Web Summary : A Badlapur-bound local train overshot the Vikhroli platform on the Central Railway line. An emergency brake was applied. Passengers destined for Vikhroli were accommodated at Bhandup. Concerns rise over motorman training and passenger safety due to increasing similar incidents.
टॅग्स :मुंबई उपनगरी रेल्वेमध्य रेल्वे