Join us
Daily Top 2Weekly Top 5

BREAKING: मुंबई सेंट्रलला लोकल घसरली, पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 13:21 IST

मुंबईत पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकात लोकल रुळावरुन घसरल्यानं दुर्घटना घडली आहे.

मुंबई

मुंबईत पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकात लोकल रुळावरुन घसरल्यानं दुर्घटना घडली आहे. ही लोकल कारशेडमध्ये जात होती. त्यामुळे लोकलमध्ये प्रवासी नव्हते. लोकल आपल्या फेऱ्या पूर्ण करुन कारशेडमध्ये जात असताना ही दुर्घटना घडली आहे. लोकलचं चाक रुळावरुन घसरलं आहे. 

पश्चिम रेल्वेकडून तातडीनं लोकल ट्रॅकवरुन बाजूला काढण्याचं काम हाती घेण्यात आलं. या दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वेच्या एक नंबर प्लॅटफॉर्मवरची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे दादर स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली आहे. तर मरिन लाइन्स स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर लोकल थांबून आहेत. 

टॅग्स :मुंबई लोकलमुंबई