लवकरच सर्वांसाठी लोकलचा निर्णय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:30 IST2021-02-05T04:30:43+5:302021-02-05T04:30:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सर्वांसाठी लोकल रेल्वेसेवा सुरू करण्यासंदर्भात सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा ...

लवकरच सर्वांसाठी लोकलचा निर्णय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सर्वांसाठी लोकल रेल्वेसेवा सुरू करण्यासंदर्भात सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने गर्दी होणार नाही अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरू करता येईल यादृष्टीने विविध पर्यायांवर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जराड, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर यांच्यासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.