Join us  

डॉ. सुधीर मेहता, विशाल चोरडिया यांचा इंडस्ट्री अँड बिझनेस विभागातील लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारानं सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 7:06 PM

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024: महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळा मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे दिमाखात साजरा झाला.

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024:राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येते. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकने नुकतीच जाहीर करण्यात आली होती. बिझनेस अँड इंडस्ट्रीज विभागात यंदा पाच जणांना नामांकनं मिळाली होती. त्यात, पिनॅकल इंडस्ट्रिजचे डॉ. सुधीर मेहता आणि सुहाना : प्रवीण मसालेचे विशाल चोरडिया विजेते ठरले. त्यांना आज 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' २०२४ या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

डॉ. सुधीर मेहता यांच्याविषयी

सुधीर मेहता हे भारतातील आघाडीची ऑटोमोटिव्ह उत्पादने आणि विशेष वाहन कंपनी पिनॅकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते एक कमर्शियल इलेक्ट्रिक व्हेइकल आणि तंत्रज्ञान कंपनी ईकेए मोबिलिटीचे संस्थापक आणि अध्यक्षदेखील आहेत. यापूर्वी आर्मी इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी द्वारे यशस्वी उद्योजक पुरस्कार २०२२, मध्य प्रदेश इनोव्हेशन लीडरशीप अवॉर्ड २०२१, मशीनिस्ट मॅगझीनद्वारे सुपर एंटरप्रेन्योर ऑफ इयर २०१८ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

विशाल चोरडिया यांच्याविषयी...

विशाल चोरडिया हे सुहाना: प्रवीण मसालेवालेचे स्ट्रॅटजी, मार्केटिंग आणि फायनान्स विभागाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र खादी ग्रामोद्योगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी आपली भूमिका पार पाडली आहे. ग्रामीण भागातील रोजगारासंदर्भात त्यांनी मोलाचं योगदान दिलं आणि त्यांचा अभ्यासही आहे. सुहाना : प्रवीण मसाल्याच्या माध्यमातूनही त्यांनी मोठं नाव कमावलं आहे. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' २०२४ च्या सुपर ज्युरिंमध्ये लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, लोकमत मीडिया प्रा.लि.चे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, मुंबई पोलीस विशेष आयुक्त देवेन भारती, पद्मश्री सोनू निगम, एव्हेन्यू सुपरमार्ट्स लि. चे अध्यक्ष रमेश दमाणी, एमक्योर फार्मा लिमिमटेडच्या कार्यकारी संचालक नमिता थापर, शास्त्रीय गायक आणि राष्ट्रीय पुस्कार विजेते महेश काळे, नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर, इन्स्टिट्युट ऑफ गॅस्ट्रो सायन्स रिलायन्स हॉस्पीटलचे पद्मश्री अमित मायदेव, आदर्श गाव कार्यक्रम हिवरे बाजारचे अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, बालकृष्ण इंडस्ट्रिज लि. चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार यांचा समावेश होता. 

टॅग्स :लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2024मुंबईमहाराष्ट्र