Join us  

LMOTY 2024: तरुणांना मनोविकारातून बाहेर काढणाऱ्या डॉ. मिराज कादरी यांचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर' पुरस्काराने गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 6:55 PM

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024: मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या भव्य दिव्य सोहळ्यात झाले पुरस्कारांचे वितरण

Dr. Meraj Kadri, Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024: वैद्यकीय, क्रीडा, कृषी, राजकारण, उद्योग, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दरवर्षी 'लोकमतमहाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येते. आज मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या भव्य दिव्य अशा 'लोकमतमहाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२४'च्या सोहळ्यात वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिल्यानिमित्त मनोविकार तज्ञ डॉक्टर मिराज कादरी यांना पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आले.

आजकाल तरूणपणीच अनेकांना मानसिक विकार जडतो. कुणी परीक्षेत नापास झाले म्हणून, कुणी जवळचं दुरावलं म्हणून तर कुणी नोकरी-व्यवसायात अपयशी झाले म्हणून मानसिकदृष्ट्या खचतात. तरुणाईच्या हातात असलेल्या मोबाईलमुळेही मनोविकार वाढत आहेत. अशा तरुणांना मनोविकारातून बाहेर काढणारा डॉक्टर म्हणून मनोविकार तज्ञ डॉक्टर मिराज कादरी यांची ओळख आहे. मनोरुग्णांचा उपचार हा महागडाच ठरतो. त्यामुळे अनेक जण उपचार घेत नाहीत. ही बाब ओळखून डॉक्टर कादरी यांनी नाममात्र शुल्कात उपचार देण्यास सुरुवात केली. त्यामुळेच १२० खाटांचे रुग्णालय नेहमीच मनोरुग्णांनी भरलेले असते. महिन्याला जवळपास २५०० मनोरुग्णांना बरे करण्याचे काम ते करीत आहेत. पूर्ण उपचार घेणाऱ्या मनोरुग्णांच्या ऑफिसमध्ये 'आता तो बरा झाला...' हे सांगण्यासाठीही डॉक्टर कादरी नेहमीच पुढे असतात. त्यांना आज त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्यासाठी गौरविण्यात आले.

यंदाच्या विजेत्यांची निवड करण्यासाठी परीक्षक मंडळ तयार करण्यात आले होते. या 'सुपर ज्युरी'मध्ये डॉ. विजय दर्डा, सुधीर मुनगंटीवार, धनंजय मुंडे, देवेन भारती, सोनू निगम, रमेश दमाणी, नमिता थापर, महेश काळे, डॉ. विजय भटकर, डॉ. अमित मायदेव, पोपटराव पवार, राजीव पोद्दार आणि ऋषी दर्डा यांचा समावेश होता.

टॅग्स :लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2024मुंबईमहाराष्ट्रलोकमतडॉक्टर