Join us

मीनी ड्रेसमध्ये आली लिसा मिश्रा, लुंगी घातल्यावरच घेतले अंधेरीच्या राजाचे दर्शन!

By मनोहर कुंभेजकर | Updated: September 2, 2022 20:40 IST

लिसा मिश्रा या २०१८ च्या भारतीय चित्रपट वीरे दी वेडिंगमधील तारीफान गाण्याच्या रिप्राइझ व्हर्जनसाठी  प्रसिद्ध आहे.

मुंबई-दरवर्षी संकष्टी चतुर्थीला विसर्जन होणारा आणि नवसाला पावणारा म्हणून अंधेरीच्या राजाची ख्याती आहे.येथे दर्शनाला तोकडे कपडे घालून येणाऱ्या गणेश भक्तांना दर्शनाला मज्जाव आहे. आज सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय अमेरिकन गायिका आणि गीतकार लिसा मिश्रा अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला आली होती. यावेळी तीने मिनी ड्रेस घातला होता. तोकडे कपडे घालून अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला मज्जाव असल्याने यावेळी येथील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तिला लुंगी दिली. मग तिने अंधेरीच्या राजाचे मनोभावे दर्शन घेतले.आणि विशेष म्हणजे उंदीर मामाच्या कानात तिने मनातील इच्छा देखिल सांगितली.

लिसा मिश्रा या २०१८ च्या भारतीय चित्रपट वीरे दी वेडिंगमधील तारीफान गाण्याच्या रिप्राइझ व्हर्जनसाठी  प्रसिद्ध आहे. तेव्हापासून, तिने २०१९ च्या जजमेंटल है क्या चित्रपटातील द वखरा गाणे, द स्काय इज पिंक या चित्रपटातील नादानियां आणि गुड न्यूज मधील चंदीगड में पार्टी-गीत यांसारख्या गाण्यांवर काम केले आहे. आमच्याकडे तोकडे कपडे घालून अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला मज्जाव आहे. मात्र गणेश भक्तांना येथे दर्शन मिळण्यासाठी येथे त्यांना कपडे परिधान करण्यासाठी दिले जातात. मग ते मनोभावे अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतात अशी माहिती आझाद नगर सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक शैलेश फणसे यांनी लोकमतला दिली. 

टॅग्स :गणेशोत्सवगणेशोत्सवसंगीत