वादळी पावसामुळे विजेचा लपंडाव
By Admin | Updated: June 25, 2015 00:36 IST2015-06-25T00:36:55+5:302015-06-25T00:36:55+5:30
गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे जीर्ण झालेले

वादळी पावसामुळे विजेचा लपंडाव
गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे जीर्ण झालेले विद्युत खांब पडल्याने अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी पडलेले विजेचे खांब, वीजवाहिन्यांवर पडल्याने वीजपुरवठा खंडीत झाला आहे.
वीज पुरवठा दुरस्तीचे काम वितरणकडून सुरू असले तरी वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. तांत्रिक बिघाड तर काही ठिकाणी दोषच सापडत नसल्याने तो शोधण्यातच वितरणच्या कर्मचाऱ्यांचा अधिक वेळ जात आहे. उरणमधील अनेक गावे गेल्या चार दिवसांपासून अंधारात आहेत.
मुरुड, बोर्ली पंचतनमधील गावे गेल्या चार दिवसांपासून काळोखात आहेत. पनवेल, महाड तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्रीच्या वेळी वीज गेल्याने नागरिकांचे हाल होत असून पाणी समस्याही उद्भवली आहे. काही शहरांत नागरिकांनी वीज वितरणच्या कार्यालयावर आपला मोर्चा वळवला असून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने वितरणविरोधात तीव्र नाराजी आहे.