पथनाट्यामधून प्रकाश सुर्वेंचे व्हिजन
By Admin | Updated: October 7, 2014 02:10 IST2014-10-07T02:10:17+5:302014-10-07T02:10:17+5:30
मागाठाणे मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांनी प्रचारासाठी पथनाट्याचे हत्यार उपसले आहे.

पथनाट्यामधून प्रकाश सुर्वेंचे व्हिजन
मुंबई : मागाठाणे मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांनी प्रचारासाठी पथनाट्याचे हत्यार उपसले आहे. पथनाट्यांच्या माध्यमातून ते येथील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या समस्या आणि आमदार म्हणून निवड झाल्यावर निश्चित केलेले उद्दिष्ट जनतेसमोर मांडत आहेत.
सुर्वे यांचे व्हिजन घेऊन हे पथनाट्य मागाठाणे मतदारसंघात सर्वत्र सादर होत आहे. विशेष म्हणजे या पथनाट्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.
या पथनाट्यामधून मागाठाणेतल्या वीज, पाणी, शौचालये, रस्ते, वाहतूककोंडी, शिक्षण, आरोग्य, रोजगार अशा अनेक समस्या मांडण्यात येत आहेत. या समस्या सोडविण्यासाठी सुर्वे काय उपाय योजणार, कोणते नवे प्रकल्प आणणार याचीही माहिती देण्यात येत आहे.
जाहिरातींच्या युगात सुर्वेंनी अवलंबलेले हे प्रचारसाहित्य अत्यंत प्रभावी ठरत आहे. यातून शिवसेनेची भूमिका, सुर्वेंचे व्हिजन सर्वदूर पसरत आहे, अशी माहिती मागाठाणेतील शिवसैनिक देतात. (प्रतिनिधी)