विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात "लाईट आणि साऊंड शो" सुरु करणार
By मनोहर कुंभेजकर | Updated: February 19, 2024 21:55 IST2024-02-19T21:54:52+5:302024-02-19T21:55:41+5:30
पालकमंत्री मंगलप्रभात लोढा याची घोषणा

विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात "लाईट आणि साऊंड शो" सुरु करणार
मनोहर कुंभेजकर, मुंबई-छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महामुंबई मराठा मोर्चा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात मराठा समाजाच्यावतीने आमदार अँड आशिष शेलार यांनी ही मागणी केली.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त येथे आज महाराजांची आरतीही करण्यात आली.मराठा महा संघाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
डिपीडीसी फंडातून या भव्य पुतळ्याच्या परिसरात लाईट आणि साऊंड शो सुरू करण्यात यावा, जेणेकरून हा परिसर एक आंतरराष्ट्रीय केंद्राच्या दर्जाचे होईल, अशी मागणी शेलार यांनी केली.
पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तातडीने मागणी मान्य करीत अशा प्रकारचा शो सुरु करण्याची घोषणा केली.