लिफ्ट कोसळून अपघात; दोघे जखमी

By Admin | Updated: May 11, 2015 02:12 IST2015-05-11T02:12:47+5:302015-05-11T02:12:47+5:30

१८ मजली टॉवरची लिफ्ट कोसळून अपघात झाल्याची घटना रविवारी दादरमध्ये घडली. अपघातादरम्यान लिफ्टमध्ये अडकलेल्या तीन जणांपैकी दोन जण जखमी झाले.

Lift collapse accidents; Both injured | लिफ्ट कोसळून अपघात; दोघे जखमी

लिफ्ट कोसळून अपघात; दोघे जखमी

मुंबई : १८ मजली टॉवरची लिफ्ट कोसळून अपघात झाल्याची घटना रविवारी दादरमध्ये घडली. अपघातादरम्यान लिफ्टमध्ये अडकलेल्या तीन जणांपैकी दोन जण जखमी झाले. जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दादर पश्चिमेकडील फूल मार्केटमध्ये एसआरएची जनशक्ती नावाची १८ मजली इमारत आहे. रविवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास लिफ्टमध्ये बिघाड होत आठव्या मजल्यावरून लिफ्ट तळमजल्यावर कोसळली. या वेळी लिफ्टमनसह तीन जण लिफ्टमध्ये अडकून होते. याची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी बचाव मोहीम सुरू केली. अग्निशमन दल आणि दादर पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. मात्र अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच स्थानिकांनी लिफ्टमध्ये अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढले. यामध्ये एका महिलेसह दोन जण जखमी झाले आहेत. तिघांनाही तातडीने केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. लिफ्ट अचानक कशी कोसळली, याची अधिक माहिती पोलीस घेत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Lift collapse accidents; Both injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.