Join us  

हृदयविकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा बदल! तज्ज्ञांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 3:44 AM

हार्ट फेल्युअर आणि हार्ट अटॅक यांमध्ये खूप फरक आहे. हार्ट अटॅकमध्ये हृदयाला रक्त व आॅक्सिजन मिळू शकत नाही. ज्यामुळे हृदयाच्या मांसपेशी कमजोर होऊ लागतात.

मुंबई  - हार्ट फेल्युअर आणि हार्ट अटॅक यांमध्ये खूप फरक आहे. हार्ट अटॅकमध्ये हृदयाला रक्त व आॅक्सिजन मिळू शकत नाही. ज्यामुळे हृदयाच्या मांसपेशी कमजोर होऊ लागतात. तर हार्ट फेल्युअरमध्ये हृदय योग्यरीत्या पंप करू शकत नाही आणि यामुळे संपूर्ण शरीरात रक्त पोहोचू शकत नाही. या स्थितीत, रुग्णाला श्वास घेण्यामध्ये समस्या येऊ लागते. त्याच्या पायांना सूज येऊ शकते आणि यामुळे रुग्णाच्या मानसिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो. हृदयविकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करणे गरजेचे आहे, हे वेळीच प्रत्येकाने ओळखले पाहिजेहार्ट फेल्युअरसंदर्भात सर्वांत चिंता करण्याजोगी बाब ही आहे की, या स्थितीत रुग्णाला हृदयाची कोणतीही वेदना जाणवत नाही आणि अचानक दुखू लागते. तर हार्ट अटॅकमध्ये रुग्णाला अचानक छातीत दुखू लागते आणि त्याचवेळी उपचार केला नाही, याविषयी हृदयविकारतज्ज्ञ डॉ. ब्रायन पिंटो यांनी सांगितले की, कुटुंबात इस्केमिक हृदयविकारांचा इतिहास असणे, कोरोनरी आर्टरी विकार (सीएडी), हृदयविकाराचा धक्का, उच्च रक्तदाब, हृदयाच्या झडपेचा आजार, कार्डिओमायोपथी, फुप्फुसांचे विकार, मधुमेह, स्थूलता, मद्य किंवा अमलीपदार्थांचे सेवन आणि एकंदर कुटुंबातील हृदयविकाराबाबतचा इतिहास यांचा हार्ट फेल्युअरमागील धोक्याच्या घटकांमध्ये समावेश होतो.हृदयाच्या कमजोर मांसपेशींना पुन्हा बरे करता येऊ शकत नाही, म्हणूनच औषधे व थेरपींनी हे नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. हा आजार नियंत्रित करण्याकरिता जीवनशैलीमध्ये बदल करणे अत्यंत आवश्यक आहे, त्याबरोबरच बऱ्याच थेरपी जसे की, बीटा ब्लॉकर, एसीई इनहिबिटरसारखी औषधे, हाय बीपी किंवा डायबेटिससारख्या आजारांवर उपचार करता येतात. - डॉ. सत्यवान लोणकर, हृदयविकारतज्ज्ञंहार्ट फेल्युअरची लक्षणेश्वास घेण्यास त्रास, पाय किंवा घोट्यांवर सूज, थकवा किंवा कमजोरी जाणवणे, रात्री पुन्हा-पुन्हा लघवी करण्याची जाणीव होणे, धाप लागणे, भूक न लागणे किंवा मळमळणे, अचानक वजन वाढणे, एकाग्रता कमी होणेवेळेवर ओळखाहार्ट फेल्युअर ओळखणे जास्त कठीण नाही. याची ओळख मेडिकल हिस्ट्री तपासत, लक्षणे ओळखून, शारीरिक तपासणी, रिस्क फॅक्टर यांसारख्या उच्च रक्तदाब, कोरोनरी आर्टरी आजार किंवा डायबेटिस होणे व लॅबोरेटरी टेस्टने करता येऊ शकते़तणाव वाढवू शकतो हार्ट फेल्युअरची रिस्कतणाव शरीरामध्ये केमिकल प्रतिक्रिया करतो, ज्यामुळे एडरेनालाइल आणि इतर हार्मोन हृदयाची गती व श्वास घेण्याची गती वाढवते, त्यामुळे रक्तदाबाचा स्तर वाढतो आणि या प्रतिक्रियेला पूर्ण करण्याकरिता हृदय जलदतेने पंप करावे लागते, जेणेकरून जास्त प्रमाणात आॅक्सिजन शरीराला दिला जाऊ शकेल. जर ही प्रतिक्रिया दररोज सतत होत राहिली, तर जलदतेने पंप करणे कठीण होऊन जाते़

टॅग्स :आरोग्यबातम्या